श्वासाचा मागोवा आणि चित्तांतील शांतता !
श्वासोछ्वास ही शरीराची अत्यंत महत्वाची नैसर्गिक क्रिया आहे. जीवंतपणाचे ते सर्वांत प्रमुख लक्षण असते. श्वास आहे तर जीवंतपणा आहे. त्याच्या शिवाय देह केवळ मृत झालेला असेल. जगण्यासाठी प्राथमिक गरज असते ती प्राणवायुची. अर्थात ऑक्सिजनची. वातावरणात तो मुबलक प्रमाणांत असतो. शरीर तो शोषून घेतो. व त्यातून शक्ती अर्थात उर्जा प्राप्त होते. जगण्याचे ते आद्य व प्रमुख साधन. […]