श्री रामरक्षा
पूर्वी प्रत्येक घरातून श्री रामरक्षा संध्याकाळी म्हंटली जायची . कधी कधी वडीलधारी मंडळी सोप्यावर संध्याकाळी फे-या मारत आणि रामरक्षा मोठ्या आवाजात म्हणत. ती ऐकत असताना लहान मुलांची आपोआप पाठ होत असे. संध्याकाळी रामरक्षा स्तोत्र म्हणणे हे हिंदू घर असल्याची एक खूण होती.घराचा सुसंस्कृतपणा या स्तोत्रावरून ओळखला जायचा.संध्याकाळी तुळशी वृंदावना जवळ दिवा लावणे.घरात देवाजवळ दिवा लावणे . […]