जीवन आनंद
ह्या जीवनाच्या अस्तित्वाचे, ध्येय कोणते खरे । उत्तर याचे कुणा मिळेना, आज पावतो बरे ।। संतसाधू आणि ज्ञानीजन, बहूत ते झाले । समाधानी परि एक मताचे, उत्तर नाही दिले ।। खेळखेळणे उड्या मारणे, अन् खाणे पिणे । बालपणीच्या आनंदाला, नव्हते काही उणे ।। विसरून जाता खेळ उड्या अन् , प्रेम करू लागलो । यौवनाच्या उंबरठ्यावरी, बहरून […]