अमेरिकेतील थॅंक्सगिव्हींग सेल – भाग ६
मी रांगेत उभा राहून आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेत होतो. लोकांच्या carts नुसत्या भरभरून ओसंडून वहात होत्या. माझ्या cart मधे जेमतेम तीन चार वस्तू असल्यामुळे, इतरांच्या तुलनेत माझी cart म्हणजे, गुटगुटीत पोरांमधे एखादंच किरकिरं पोर असावं, तशी दिसत होती. लोकांच्या चेहर्यावरून कृतार्थतेचा आनंद नुसता ओसंडून वहात होता. लोकांनी खरोखरच वर्षभराचं शॉपिंग या काही मिनिटांतच केलं असावं हे […]