नवीन लेखन...

वेडी

रस्त्यावर उभी राहूनी, हातवारे ती करीत होती, मध्येच हसते केंव्हां रडते, चकरा मारीत बसे खालती ।।१।।   गर्दी जमली खूप बघ्यांची, कुत्सीतपणे न्याहळू लागली, ‘शिपाई आणा जावूनी कुणी’, ठाण्यात नेण्यास सांगू लागली ।।२।।   जीवनातील दु:खी चटका, सहनशक्तीचा अंत पाहतो, मनावरील ताबा सुटूनी, वेडेपणा हा दिसून येतो ।।३।।   इतकी गर्दी जमून कुणीही, तिच्या मनीचा ठाव […]

अमेरिकेतील थॅंक्सगिव्हींग सेल – भाग ४

दुसर्‍या दिवशी पहाटे चारला उठून प्रातर्विधी उरकून साडेचारपर्यंत घरातून निघायचे होते. लढाईची स्ट्रॅटेजी ठरवता ठरवताच साडेबारा वाजले होते त्यामुळे सगळे जण गजराची वाट पहात पहात झोपी गेलो. पहाटे गजर झाल्यावर एकच धांदल उडाली. सगळेजण लगबगीने तयार होऊ लागले. नोव्हेंबरचा महिना असल्यामुळे कडाक्याची थंडी पडली होती. सगळ्यांनी स्वत:ला गरम कपडयांत लपेटून टाकलं होतं. गुर्जरांचं घर पहिल्या मजल्यावर […]

मला देव दिसला – भाग ११

ज्या सगुण ईश्वरी स्वरूपाची कल्पना तुमच्या मनात पक्के घर करून असेल तर कदाचित तसेच तुम्हास दिसू शकते वा जाणवू शकते. भाव तसा देव म्हणतात, त्याप्रमाणे परंतू हा प्रयत्न अपूर्ण असाच ठरणारा असेल. तुम्हास असत्याच्या दालनात नेणारा असेल. तुमचे सगुण ईश्वराबद्दलचे ज्ञान आणि त्याचे इच्छीत दर्शन हेच मग तुमचे ध्येय बनते. ईश्वराला जाणण्यापेक्षा त्याच्या दिव्यत्वाला अनुभवने, त्याच्याशी […]

प्रतिक्रिया

क्रियेला प्रतिक्रिया, ध्वनीला प्रतिध्वनी  । तत्व ते सनातन, दिसे नित्य जीवनी  ।।१।।   फेकतां जोराने, आदळे भिंतीवरी  । प्रवास परतीचा, होई तुमचे उरीं  ।।२।।   शिवी वा अपशब्द, दिले कुणासाठी  । येऊनी धडकतील, तुमचेच पाठीं  ।।३।।   प्रेमाने बोलणे, सुंगध आणिते  । आनंदी लहरी, मनां सुखावते  ।।४।।   — डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com […]

निसर्गाची ध्यान प्रक्रिया

खिडकीमधून बाहेर बघत होतो. झाडाच्या एका फांदीवर एक कबूतर बसले होते. त्याचे डोळे व चेहरा मला स्पष्ट दिसत होता. डोळे मिटून कसलीही […]

व्यसनाधिनता आणि ती…

व्यसनांच्या दिशेने जर स्त्रियांची पावले वळ्त असतील तर त्यांना वेळीच आवर घालावा लागेल अन्यता आपल्या समाजाचं, देशाचं, आपल्या देशातील भावी पिढीचं आणि पर्यायाने स्त्रियांच भविष्यही धोक्यात येईल. त्याहूनही दखल घेण्याजोगी गोष्ट म्हणजे गुन्हेगारी आणि व्यसनाधिनता यांचा फारच जवळ्चा संबंध असतो त्यामुळे गुन्हेगारीतही मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. […]

मराठीचा पहिला ग्रंथ ‘विवेकसिंधू’ आजही उपेक्षाग्रस्त

मराठीतला पहिला ग्रंथ कोणता असा प्रश्न विचारला की पहिले उत्तर असते “ज्ञानेश्वरी”. मात्र ज्ञानेश्वरीच्याही आधी १०० वर्षांपूर्वी मराठीतला पहिला ग्रंथ लिहिला गेला तो होता “विवेकसिंधू” आणि त्याचे लेखक होते “मुकुंदराज”. ज्ञानेश्‍वरीच्या मोठेपणाला आव्हान देण्याचे कारण नाही. परंतु ज्ञानेश्‍वरी मराठीचा आद्यग्रंथ नक्कीच नाही असे मुकुंदराजांच्या अनुयायांचे म्हणणे आहे. मराठी जगतेय की मरतेय यावर तावातावाने चर्चा करणार्‍या आणि […]

सरकार आणि सौंदर्यदृष्टी !!

माझं काही कामानिमित्त फोर्ट-चर्चगेट परिसरात जाणं होतं..हा परिसरच मुळी माझ्यावर गारूड करतो..सीएसटी पासून रमत गमत चालत निघायचं, ते सरळ  काळ्या घोड्यापर्यंत. तिथून पुढे रिगलच्या दारात असलेल्या विलिंग्डन फाऊंटनला वळसा घालून, सायन्स इन्स्टिट्यूट उजव्या हाताला ठेवून, पुढे त्याच रस्त्याने पुढे उजव्या बाजूचा वळसा घेऊन युनिव्हर्सिटी,  हायकोर्टाची मागली बाजू धरून  चर्चगेटला यायचं आणि मग लोकलने  घराच्या दिशेने.. कित्येकदा […]

उदबत्ती एक आत्मसमर्पण

उदबत्तीचा सुगंध दरवळे चोहोकडे, कोठे लपलीस तूं प्रश्न मजला पडे ।।१।।   मंद मंद जळते शांत तुझे जीवन, धुंद मना करिते दूर कोपरीं राहून ।।२।।   जळून जातेस तूं राख होऊनी सारी, तुझे आत्मसमर्पण सर्वत्र सुगंध पसरी ।।३।।   तुझेपण वाटते क्षुल्लक दाम अति कमी, आनंदी होती अनेक जेव्हां येई तूं कामीं ।।४।।   लाडकी तूं […]

संधी

गंगा आली मार्गामध्ये         तहान आपली भागवून घे संधी मिळता जीवनामध्ये     उपयोग त्याचा करून घे   ठक ठक करुनी दार ठोठवी      संधी अचानक केव्ह्ना तरी गाफील बघुनि चित्त तुझे        निघून जाईल ती माघारी   चालत राही सुवर्ण संधी           हाका देवूनी वाटेवरी बोलविती जे प्रेमाने  तिज       सन्मान तयांचा सदैव करी   धुंदी मध्ये राहून आम्ही       चाहूल तिची विसरून जातो जीवनातले अपयश बघुनी       नशिबाला परी दोष देतो   यशस्वी ठरती तेच जीवनी      उपयोग करुनी  संधीचा साथ देऊनी प्रयत्न्याची        मार्ग निवडती योग्य दिशेचा   — डॉ. भगवान नागापूरकर […]

1 174 175 176 177 178 211
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..