अमेरिकेतील थॅंक्सगिव्हींग सेल – भाग २
आमचं सू सेंटर हे छोटं गाव, आयोवा राज्याच्या अगदी वायव्य (north west) कोपर्यात येतं. तिथून अर्ध्या पाऊण तासाच्या अंतरावर साउथ डकोटा राज्याची हद्द सुरू होते. थोडं वेगळ्या दिशेने उत्तरेला गेलं की मिनेसोटा राज्याची हद्द सुरू होते आणि नैऋत्य दिशेला (southwest) गेलं की तासा दीड तासानी नेब्रास्का राज्याचा काही भाग लागतो. ही सगळी राज्यं तशी भरपूर मोठी […]