नवीन लेखन...

समर्थ रामदास स्वामी ………६

समर्थांनी मराठी छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांना लिहिलेली दोन पत्रे इतिहासाला ज्ञात आहेत.या पैकी शिवरायांनी जो अभूत पूर्व पराक्रम केला त्याबद्दल त्याची स्तुती करणारे एक पत्र आहे.त्याच प्रमाणे शिवरायांच्या स्वर्गवासानंतर त्याचे सुपुत्र महा पराक्रमी छत्रपती संभाजी महाराजांना लिहिलेले दुसरे पत्र आहे.पहिल्या पत्रात शिवरायांची स्तुती आहे तर दुस-या पत्रात शिव छत्रपतींच्या गादीवर आरूढ झालेल्या संभाजी महाराजांना उपदेश […]

समाधानी वृत्ती

कशांत दडले समाधान ते, शोधत असतो सदैव आम्ही, धडपड सारी व्यर्थ होऊनी, प्रयत्न ठरती कुचकामी ।।१।। बाह्य जगातील वस्तू पासूनी, देह मिळवितो सदैव सुख, क्षणीकतेच्या गुणधर्माने, निराशपणाचे राहते दुःख ।।२।। ‘समाधान’ ही वृत्ती असूनी, सुख दुःखातही दिसून येती, चित्त तुमचे जागृत असतां, समाधान ते सदैव मिळते ।।३।। सावधतेने प्रसंग टिपता, समाधान ते येईल हाती, सुख दुःखाला […]

समर्थ रामदास स्वामी …….५

समर्थांनी मनावर भाष्य करणारे २०५ श्लोक लिहिले त्यांनाच मनाचे श्लोक असे म्हणतात.मानवाच्या अशांतीचे मूळ म्हणजे त्याचे मन ! या मनापासून मुक्त होण्यासाठी मनच कसे उपयोगी पडते याचे विवेचन समर्थांनी मनाच्या श्लोकात केले आहे.संत एकनाथांनी ‘जोशी’ या नावाचे भारुड लिहिले आहे.त्यात भारुडात ते मनाचा उल्लेख करताना म्हणतात — ” मानाजी पाटील देहागावीचा विश्वास धरू नका त्याचा. ” […]

लोभस चांदणे

चंद्र आज एकला नभी उगवला । रात पुनवेची मधूर भासला ।। मेघांचा गालीचा आज नाहीं दिसला । शितल वारा अंगी झोंबू लागला ।। उलटून गेली रात्र मध्यावरती । लुक लुकणारे तारे आतां दिसती ।। पेटल्या गगनीं असंख्य फुलवाती । तीव्र-मंद प्रकाशानें त्या चमकती ।। त्या असंख्यात चंद्रमा एकची सापडे । जो लोभसवाणा म्हणूनी सर्वा आवडे ।। […]

समर्थ रामदास स्वामी …..३

समर्थांनी शिवथर घळीत त्याचे पट्ट शिष्य कल्याण स्वामी यांना दासबोध सांगितला आणि कल्याण स्वामी यांनी तो लिहून काढला. दासबोधा शिवाय समर्थांनी निर्माण केलेले वाङ्मय प्रचंड आहे . या शिवथर घळीचे महात्म खूप मोठे आहे. महाड- भोर रस्त्यावर माजेरी हे गाव लागते. त्या गावा पासून ४ मैलावर शिवथर घळ आहे. समर्थांनी या ठिकाणी वाङ्मय निर्मिती केली.दासबोध लिहिला […]

शहरी माणसाच्या नजरेतून… नागपूर येथील दुसरे मराठी शेतकरी साहित्य संमेलन ….

प्रती, श्री. गंगाधर मुटे, कार्याध्याक्ष अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नमस्कार, दुसरे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन दिनांक २०-२१ फेब्रुवारी २०१६ रोजी नागपूर येथे अतिशय झोकात आणि उत्साहात पार पडले ह्यात शंकाच नाही. तुमचे, तसेच सर्व सहकाऱ्यांचे मी रविंद्र कामठे हार्दिक अभिनंदन आणि करावे तितके कौतुक थोडे आहे.  सर्वांची नावे घेणे योग्य नसल्यामुळे माझा […]

माझी बोली भाषा

एका संकेतस्थळावर बोली भाषेत भाषेत साहित्य पाठविण्याचा संदेश मिळाल्यावर विचारात पडलो माझी बोली भाषा कुठली. घरात हि हिंदी आणि मराठी मिश्रित भाषा बोलली जाते. एकांतात विचार सुद्धा कधी हिंदीत तर कधी मराठीत करतो. शालेय शिक्षण हिंदीत आणि पुस्तके वाचून शिकलेली मराठी. या दोन्ही निश्चित माझ्या बोली भाषा नाही. कारण मला हिंदीतली कुठली हि बोली भाषा अवगत […]

औचित्य जागतिक मराठी भाषा दिनाचे!

कविवर्य श्री विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस. हाच दिवस महाराष्ट्र शासनाने मराठी राजभाषा दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्याचे घोषित केले आणि जागतिक मराठी अकादमीने या कामी पुढाकार घेत हा दिवस आपण ‘जागतिक मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा करतो. समस्त मराठी जनांना ‘जागतिक मराठी भाषा दिवसाच्या’ हार्दिक शुभेच्छा..! भाषेचा प्रश्न केवळ महाराष्ट्रालाच […]

पाषाणाच्या देवा

हादरून गेलो मनात पूरता, ऐकून त्याची करूण कहानी । केवळ एका दु:खी जीवाने, हृदय दाटूनी आणीले पाणी ।।१।। असंख्य सारे जगांत येथे, प्रत्येकाचे दु:ख निराळे । सहन करिल का भार येवढा, ऐकूनी घेता कुणी सगळे ।।२।। सर्व दुखांचा पडता डोंगर, काळीज त्याचे जाईल फाटूनी । कसाही असो निर्दयी कठोर, आघात होता जाईल पिळवटूनी ।।३।। मर्म जाणीले […]

सिर सलामत तो ‘हेल्मेट’ पचास !

मोडेन पण वाकणार नाही या उक्तीप्रमाणे देहाचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे डोके (शीर) जे आपण सहजासहजी कोणापुढे झुकवत नाही. देव, सद्गुरू किंवा आपल्या आई-वडिलांच्या समोर वाकून नमस्कार करण्यासाठी वापरतो. म्हणजे याचे महत्व नक्की जास्त आहे ते जपलं पाहिजे आणि त्यासाठी त्याची योग्यती काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. पूर्वीच्याकाळी म्हणजे साधारण इ.स.पू. ९०० मध्ये लढताना एखादा भाल्याचे […]

1 184 185 186 187 188 211
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..