2016
द्रौपदी वस्त्रहरण
ह्रदयद्रावक प्रसंग आला द्रौपदीवरी, विटंबना करुं लागले कौरव जमुनी सारी ।।१।। द्युतामध्यें हरले होते पांडव बंधू सारे, द्रौपदीस लावले पणाला जेव्हां कांहीं न उरे ।।२।। वस्त्रहरण करीत होता दुष्ट तो दुर्योधन, हताश झाले होते पांडव हे सारे बघून ।।३।। ‘ द्वारकेच्या कृष्णा ‘ धावूनी ये मी दुःखत पडे, मदतीचा केला धांवा कृष्ण बंधूकडे ।।४।। धावूनी आला […]
‘मेक इन इंडीया’, सोशल मिडीया आणि आपण सामान्यजन..
मान. पंतप्रधान मोदींच्या पुढाकाराने मुंबईत भरवलेल्या ‘मेक इन इंडीया’ या ‘समर्थ भारता’चं समग्र दर्शन घडवणाऱ्या प्रदर्शनावर मी एक लेख लिहीला होता..रोहीत वेमुला, जेएनयु, भुजबळ आणि न्यायाधीशाच्या भुमिकेतील एकतर्फी मिडीया या सर्व केवळ निराशाच पैदा करणाऱ्या घटनाच्या पार्श्वभूमीवर, देशात काहीतरी ठोस पाॅझिटीव्ह आणि देश व देशवासीयांचा अात्मविश्वास वाढवणाऱ्या घटनाही देशात घडतायत, ही बाब माझ्या व्हाट्सअप व फेसबुकवरील […]
विद्या वाचस्पती अर्थात डॉक्टर शंकर अभ्यंकर
एखादा माणूस किती बुद्धिवान असू शकतो हे जर अनुभवायचे असेल तर श्री शंकर अभ्यंकर यांची प्रवचने आणि ग्रंथ संपदा अनुभवावी. प्रचंड स्मरणशक्ती , वाणीवर प्रभुत्व , ओघवती भाषा ,विनम्र निवेदन ,अनेक ग्रंथांचे ज्ञान , अतिशय सुस्पष्ट विचार हे श्री शंकर अभ्यंकर यांचे वैशिष्ठ आहे. त्यांचे ग्रंथ घरात असणे, ते वाचणे हे तुमच्या घराचे वैभव असेल .मी […]
श्री म्हाळसाकांताची आरती
अनेक कायस्थ कुटुंबात अतिशय भक्तीभावानी गायली जाणारी हि श्री म्हाळसाकांताची आरती आपल्या सर्वांच्या माहितीसाठी …. !!!! पिवळे निशाण तुमचे पिवळे शिखर ..पिवळे शिखर ! पिवळा कांचन पर्वत , पिवळा कांचन पर्वत …पिवळे नगर पिवळी तुमची काया पिवळा शृंगार ….पिवळा शृंगार ! पिवळे राजे तुम्ही …पिवळे राजे तुम्ही राणी सुकुमार ! जयदेव जयदेव जयशिव मैराळा जयशिव मैराळा […]
“सन डे” च्या सुटीची कहाणी…
आपल्याकडे सर्वसाधारणपणे रविवार हा सुट्टीचा दिवस मानला जातो. या दिवशी शाळा, कॉलेजेस, बॅंका, सरकारी कार्यालये वगैरे बंद असतात. बरीच खाजगी कार्यालयेही बंद असतात. सुट्टीचा दिवस “सन डे” म्हणजे रविवारच का असा प्रश्न कधी पडलाय? या सुटीचा इतिहास काय? ही सुटी कोणामुळे मिळाली ? कधीपासून सुरु झाली असे प्रश्न आपल्याला पडत असतील पण ते आपल्या रोजच्या कामाच्या धबडग्यात मनातच विरुन जातात. […]
सुहास्य-वचने तुमच्यासाठी
हास्य हे सर्वच आजारांवर रामबाण उपाय आहे. चेहर्यावर ओढूनताणून हसू आणता येत नाही. पण ही सुहास्यवचने आपल्याला नक्कीच हसायला लावतील.. दारुबाज नवरा त्याच्या बायकोला म्हणत असतो….. `मी नेहमीच दारूला नको म्हणत असतो …… पण काय करू, ती माझं ऐकतच नाही.’ फॅमिली कोर्टातला वकील त्याच्या अशीलाला सांगत असतो….. `घटस्फोटाचं एक महत्वाचं कारण असतं …….. लग्न’ अयशस्वी माणूस […]
हरी ओम् … Hurry Home !!
एकाद्या परक्या देशात जर आजारी पडलात तर त्यांच्याच भाषेत बोला. नाहीतर अर्थाचा अनर्थ व्हायचा !! अमेरिकेत एका भारतीयाला रस्त्यातच असतांना हृदयविकाराचा झटका आला. कोणीतरी त्याला अँब्युलन्समध्ये उचलून घेतले. तो भाविक गृहस्थ देवाची प्रार्थना करण्यासाठी सतत त्याच्या नावाचा जप करत होता. “हरी ओम् हरी ओम् हरी ओम् हरी ओम् हरी ओम् हरी ओम् हरी ओम् हरी ओम् […]
कृपा तुजवरती
कृपा होऊनी शारदेची, कवित्व तुजला लाभले शिक्षणाच्या अभावांतही, भावनांचे सामर्थ्य दिसले ।।१।। कुणासी म्हणावे ज्ञानी, रीत असते निराळी, शिक्षणाचा कस लावती, सर्व सामान्य मंडळी ।।२।। कोठे शिकला ज्ञानोबा, तुकोबाचे ज्ञान बघा, दार न बघता शाळेचे, अपूर्व ज्ञान दिले जगा ।।३।। जिव्हेंवरी शारदा, जेव्हा वाहते प्रवाही, शब्दांची गुंफण होवूनी, कवितेचा जन्म होई….४ भाव शब्दांचा सुगंधी हार, माझी […]
साहित्याचा जनमानसावर परिणाम
साहित्याचा जनमानसावर परिणाम ‘जो वाचेल तो वाचेल’ ही म्ह्ण आपल्या मराठीत वारंवार वाचायला ऐकायला मिळते. साहित्य मग ते कोणत्याही भाषेतील का असेना जनमानसावर त्याचा परिणाम हा दिसतच असतो. अगदी अशिक्षीत माणसावरही त्याचा परिणाम होत असतो कारण अज्ञानी निरक्षर माणूसही सल्ला मागायला कोणाकडे जातो ? ज्याला साहित्याची जाण आहे ज्याचा प्रचंड अभ्यास आणि वाचन आहे अशा माणसाकडे. […]