नवीन लेखन...

आहारातील बदल भाग ६५ – चवदार आहार -भाग २७

तुरटी कशी ? या प्रश्नाचे उत्तर अनुभुति घेतल्याशिवाय येत नाही. ती तुरट आहे. हे उत्तर तर सर्वांनाच माहिती आहे. कशाप्रमाणे गोड वगैरे वर्णन करता येईल. पण तुरट म्हणजे काय ? या प्रश्नाचे उत्तर काय देणार ना ? त्यासाठी तुरटी चाखून पाहिल्यावर जे लागते त्याला तुरट म्हणतात. असेच सांगावे लागेल. यालाच अनुभुति म्हणतांत. प्रत्येक गोष्ट सिद्धत्वाच्या कसोटीवर […]

नाविन्य शोधणं म्हणजेच ‘जगणं’

ज्या जगात आपण जन्माला आलो आहोत त्या जगाकडे आणि त्यातल्या नानाविध व्ववहारांकडे डोळे, कान आदी ज्ञानेंद्रिय उघडी ठेवून आणि मनात अखंड कुतुहल ठेवून जगणं म्हणजेच सुसंस्कृतपणानं जगणं..! ज्ञानोबा माऊलींना अपेक्षित असलेले ‘चेतनाचिंतामणी’चं जगणं कदाचित असंच असावं असं मला वाटतं. वाढत्या वयाबरोबर जीवनातील अनेक झंझाटांत आपण इतके गुरफटून जातो की नविनाचा शोध घ्यायला आणि रोजच्या झालेल्या गोष्टीतलं […]

देवाप्रमाणेच राज्यकर्त्यानीही मला फसवले

“…’देवावर श्रद्धा असावी” हे जवळजवळ सर्वच ध्रम-पंथं सांगत आले आहेत. मला मात्र देवाचे एकूण वागणे आमच्या आजच्या राज्यकर्त्यांसारखे वाटत आले आहे. देव दीनांचा वाली आहे आणि संकटकाली तो भक्तांच्या मदतीला धावून जातो ह्याचे पुरावे पौराणिक ललित वाड्मयाखेरीज मला कुठे सापडतंच नाहीत. तसंच राज्यकर्ते गरीबांच्या मदतीला धावून गेलेयत ह्याची वर्णनं फक्त पक्षाच्या मुखपत्रातच वाचायला मिळतात, प्रत्यक्षात बघायला […]

क्षण भंगूर जीवन

ठसका लागून प्राण जातो, घशांत अडकून काही तरी  । क्षणांत सारा खेळ आटपतो, धडपड केली किती जरी  ।। हृदय जेव्हा बंद पडते, उसंत न मिळे एक क्षणाची  । केवळ तुम्हीं चालत असतां, यात्रा संपते जीवनाची  ।। कांचेचे  भांडे निसटता, तुकडे त्याचे होऊन जाती  । देहाचा काय भरवसा, जेव्हां सांपडे अपघाती  ।। वाढ करण्या शरीराची, पडत असती […]

किचन क्लिनीक – शेंगभाज्या – फरसबी

हिला वालपापडी असे देखील म्हटले जाते.संपुर्ण भारतात ही भाजी अत्यंत प्रसिध्द आहे.विशेषत: चायनीज पदार्थ बनवताना हिचा भरपूर वापर केला जातो.तसेच पंजाबी डिशेस मध्ये देखील हि वापरतात.हिची भाजी,उसळ देखील केली जाते.तसेच बिर्याणी,पुलाव ह्याच देखील हि घालतात. २-३ हात उंचीच्या झाडाला ह्या फरसबीचा शेंगा लागतात.ह्या कोवळ्या शेंगांचा वापर खायला केला जातो.हि भाजी चवीला गोड तुरट असून थंड असते […]

आत्म्याचा आनुवंशिक तत्व सिध्दांत – १

माझी तत्वसरणी कदाचित कुणालाही सहजासहजी पटणार नाही, याची मला पूर्ण जाणीव आहे. तरीपण ती सर्वाना सांगण्याचा मोह टाळता येत नाही. विचारांची दिशा म्हणजे विचारसरणी….तसेच तत्वांची दिशा म्हणजे तत्वसरणी असा अर्थ समोर ठेअून मी हे लेख लिहिले आहेत. जेव्हा मानव भोवतालच्या निसर्गाचं निरीक्षण करू लागला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की, निसर्गातील घटना घडण्यामागं प्रचंड शक्ती आणि कमालीची […]

आहारातील बदल भाग ६४ – चवदार आहार -भाग २६

सहा चवीपैकी शेवटची राहिली तुरट चव. तुरट या नावातच तुरटीची चव ज्याला ती तुरट असे लक्षात येते. हिरडा, पालेभाज्या, कात, सुपारी, त्रिफळा चूर्ण ही काही तुरट चवीची उदाहरणे आहेत. सर्व तुरट पदार्थ वातवर्धक आणि कफ शामक आहेत. हिरडा सोडला तर बाकी सर्व तुरट पदार्थ मलविबंध करवतात. (म्हणजे मराठीत काॅन्स्टीपेशन. ) स्तंभन म्हणजे आकुंचित करणे हे महत्वाचे […]

२६/११ ची ८ वर्षे

ताज हॉटेल जळत होते लाल रक्त गळत होते खरे भक्त साळसकर दूर शासना आळसकर पुन्हा सव्वीस अकरा नको कसाब सारखा छोकरा नको नापाक पाकडे भामटे होते शर्थीने लढणारे कामटे होते तुकारामाने कमाल केली कसाब पकडून धमाल केली लढता -लढता शहीद झाले तेंव्हा आम्हाला माहित झाले नांगरे पाटलांचा विश्वास होता ताज हॉटेलचा अभ्यास होता आत शिरून आतंकी […]

संतुलन

आकाशीं सुर्य तळपला   तेजस्वी त्याची किरणें तप्त करुनी जमिनीला   वाळून टाकी जीवने   ।। नभीं मेघ आच्छादतां    रोकती रविकिरणे तुफान पर्जन्य पडतां   महापूर त्याचा बने   ।। सुटतां भयंकर वारा   निघून जाती ढग प्रचंड वादळाचा मारा   पर्जन्य कसे होईल मग   ।। वादळास अडविती पर्वत   वलय त्याचे रोकूनी सारे करिती मदत   आनंदी करण्या धरणी   ।। एकाची शक्ती बनते    दुसऱ्यास […]

किचन क्लिनीक – शेंगभाज्या – शेवग्याची शेंग

शेंगभाज्या आता पर्यंत आपण पुष्कळ फळ भाज्या पाहिल्यात आता आपण एक वेगळा भाज्यांचा गट पाहूयात ज्यांना आपण शेंगभाज्या म्हणतो. शेवग्याची शेंग तर प्रथम पाहूयात आपण सर्वांच्याच आवडीची शेंग भाजी ती म्हणजे शेवगा.ह्या शेवग्याच्या शेंगांची भाजी,आमटी,लोणचे असे वेगवेगळे प्रकार केले जातात.कधीकधी ह्या कोवळ्या शेंगा तळून खायला देखील रूचकर लागतात. ह्या शेंगा शेवग्याच्या भल्या मोठ्या उंच वृक्षावर लागतात.ह्या […]

1 32 33 34 35 36 211
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..