नवीन लेखन...

पपईपासून प्रक्रियायुक्त पदार्थ

महाराष्ट्रात पपईची लागवड प्रामुख्याने पुणे, अहमदनगर, धुळे, नाशिक या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते. जास्तीत जास्त क्षेत्र तैवान, हवाई, वॉशिंग्टन, को- १ व को-७ या जातींच्या लागवडीखाली आहे. पिकलेल्या पपईच्या फळामध्ये ‘ अ’ जीवनसत्त्व असते. म्हणून त्याचा उपयोग डोळ्यांच्या विकारांमध्ये केला जातो. दंतरोग, अस्थिरोग व उच्च रक्तदाब इत्यादी रोगावरही ते गुणकारी आहे. […]

चिकूपासून प्रक्रियायुक्त पदार्थ

चिकूच्या झाडास वर्षभर फळे येतात. चिकूमध्ये पिष्टमय पदार्थाचे तसेच पोटाच्या विकारांसाठी उपयुक्त असलेल्या तंतुमय पदार्थाचे प्रमाण चांगले असते. फळ झाडावरून काढल्यानंतर पिकत असल्याने त्यांच्यात जैवरासायनिक क्रिया अतिशय जलद घडून येतात व फळ लगेच पक्व होऊन अल्पायुषी बनते. चिकूच्या पिकलेल्या फळापासून उत्तम प्रकारची पेये व पदार्थ तयार करता येतात. […]

मराठी गीतकार योगेश्वर अभ्यंकर

योगेश्वर अभ्यंकर हे महान गीतकार होते.  सर्जनशील कवी व लेखक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचा जन्म ५ नोव्हेंबर १९२९ रोजी झाला. ‘अक्रुरा नेऊ नको माधवा, अजिंक्य भारत अजिंक्य, अभिमानाने मीरा वदते, अमृताची गोडी तुझ्या, आज मी नाथा घरी आले’ यासारखी एकाहून सरस गाणी त्यांनी लिहिली व त्याकाळच्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये ती गाजली. योगेश्वर अभ्यंकर यांचे १४ नोव्हेंबर २००० […]

वर्‍हाडातली गाणी – ७

आला गं सासरचा वैद्दय हातात काठी जळक लाकूड पायात जोडा फाटका तुटका नेसायचं धोतर फाटक तुटक अंगात सदरा मळलेला डोक्यात टोपी फाटकी तुटकी तोंडात विडा शेणाचा कसा गं दिसतो बाई म्हायरावाणी गं बाई म्हायरावाणी आला गं माहेरचा वैद्दय हातात काठी पंचरंगी पायात जोडा पुण्यशाई नेसायचं धोतर जरीकाठी अंगात सदरा मलमलचा डोक्यात टोपी भरजरी तोंडात विडा लालेला […]

गुणांचा शोध

माणसामधील चांगल्या गुणांचा शोध घेऊन त्याच्याकडून आपणास हवी ती कामे करून घेण्यासाठी गुणग्राहकता लागते. कारण अशी चांगली माणसेच, ती ज्या संस्थेत काम करतात त्या संस्थेची भरभराट करू शकतात. ही भरभराट केवळ त्या संस्थेची नसते तर पर्यायाने समाजाची व देशाचीही असू शकते. अँड्र्यू कार्नेगी हा अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योगपती होता. केवळ चांगल्या माणसांच्या जोरावर त्याने आपल्या उद्योगाची मोठी […]

शेतीचे सामूहिक व्यवस्थापन

अमरावतीतील निमखेडच्या रौंदळे कुटुंबीयांनी शेती व्यवस्थापन योग्य पद्धतीने राबवत सामूहिक पद्धतीने शेती कशी करावी, याचा एक वस्तुपाठ इतरांसमोर ठेवला आहे. सुरुवातीला रौंदळे कटुंबियांकडे फक्त ३३ एकर शेती होती. शेतीत मिळणाऱ्या उत्पन्नातूनच त्यांनी टप्प्याटप्प्याने शेती जोडली. आता त्यांच्याकडे १३३ एकर शेती आहे. […]

आहारातील बदल भाग ४८ – चवदार आहार -भाग ९

तिखटाशिवाय जेवणाला आणि भांडणाशिवाय संसाराला लज्जत येत नाही, अशा गुणाची ही तिखट चव. हायहुई करत, नाकाडोळ्यातून पाणी येईपर्यंत खाण्याचा मोह सोडविता येत नाही, जीभेचे आणि नाकाचे टोक लालबुंद करणारी, ही तिखट चव. अन्नमार्गाच्या पहिल्या टोकापासून शेवटच्या टोकापर्यत प्रत्यक्षात परिणाम दाखवणारी ही तिखट चव ! कफाचा एक नंबरचा शत्रू. कफ म्हणजे आम, विकृत चिकटपणा, बुळबुळीतपणा, सूज, जाडी, […]

बोरापासून प्रक्रियायुक्त पदार्थ

सर्वसामान्य लोकांचे फळ मानले जाणाऱ्या बोर या फळाचे उत्पादन महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर होते. परंतु काढणीपश्चात तंत्रज्ञानाच्या अभावामुळे या फळाचे फार मोठे नुकसान होते व शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो. यासाठी त्यांना बोराचे विक्री व्यवस्थापन तसेच बोरापासून मूल्यवर्धित पदार्थ तयार करण्याचे तंत्रज्ञान माहीत असायला हवे. […]

कृतज्ञता

मी आज तुम्हांला चित्रपटातील हिरो व जगावर अधिराज्य करणारा सुपरस्टार, खर्‍या जीवनातही कसा सुपरहिरो आहे ते सांगणार आहे . . . अंदाजे जानेवारी-फेब्रुवारी 1984 सालची ही गोष्ट . . . त्या काळातील नावाजलेले सुपरहिट डायरेक्टर-प्रोड्युसर प्रकाश मेहरा हे सन 1982 ते 1984 च्या दरम्यान प्रचंड आर्थिक नुकसानीत होते . . . गाडी, बंगला व इतर संपत्ती […]

भीमसेन जोशींबद्दलचा एक ह्रुद्य किस्सा जरूर वाचा

सच्च्या स्वरांचे, पक्क्या शब्दाचे! मी त्या वेळी वाडिया ब्रदर्स, मुंबई या चित्रपट संस्थेसाठी ‘स्वयंवर झाले सीतेचे’ हे चित्र दिग्दर्शीत करीत होतो. या चित्राचे लेखक गीतकार ग. दि. माडगूळकर होते आणि संगीत वसंत देसाई यांचे. या चित्रपटात रावणाची भूमिका महत्त्वपूर्ण होती. रावण हा ऋषीकुमार सर्व विद्येत पारंगत होता. शस्त्रास्त्र शास्त्रात तो निपुण होता. गायनाचा त्याला शौक होता. […]

1 49 50 51 52 53 211
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..