नवीन लेखन...

साहित्यिक होकायंत्र

आज ते हयात नाहीत. ते कथालेखक, स्तंभलेखक. गुन्हे कथालेखन हा त्यांनी आयुष्यभर हाताळलेला साहित्य प्रकार. साधी, सरळ, सोपी भाषेत कथाचित्र डोळ्यांसमोर उभे करण्यात हातखंडा. अनेक कथासंग्रह प्रकाशित. उपप्राचार्य ते उपसंपादक पदावर कार्य केले. उत्तम वक्तृत्व. सूत्रसंचालक. दिवंगत प्रा. एकनाथ आबूज. त्यांनी बीडमध्ये कल्पना प्रकाशन सुरू केलं. आम्हा नवोदितांना हक्काचा मंच मिळाला. प्रकाशक कसा असावा याच उत्तम उदाहरण. […]

किचन क्लिनीक – दोडके

किस बाई किस दोडका किस हे फुगडी गीत मंगळा गौरीमध्ये लय फेमस हाय बुवा.तर आज आपण नव्याने ओळख करून घेऊयात ह्या दोडक्याची.अहो काही नाही हे दोडके आकांराने दिसते अगदी घोसाळ्याच सारखे फक्त ह्याला धारदार शिरा असतात बरं का.चला आपण ह्याला घोसाळ्याचा सावत्र भाऊच म्हणूयात ना.मग आता दोडके व घोसाळे ह्यात गफलत होणार नाही ना. हिचा देखील […]

स्वरभास्कराचे अपरिचित जीवन

जगाच्या कानाकोपऱ्यात ज्या भारतीय कलावंतांना ओळखले जाते, जगभरातील रसिकांवर ज्यांच्या कलाविष्काराची मोहिनी आहे त्यामध्ये स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. मात्र, थोर कलावंत हाही अखेरीस माणूसच असतो, त्याच्या हातूनही अक्षम्य प्रमाद घडू शकतात, याची प्रचिती या पुस्तकातून येते. पंडितजींचे थोरले पुत्र राघवेंद्र यांच्या मराठी पुस्तकाचा हा नेटका अनुवाद आहे. पंडितजींनी केलेल्या दुसऱ्या लग्नामुळे […]

मराठी काव्यविश्वात मनसोक्त मुशाफिरी करणारे कवी सौमित्र

आज ९ नोव्हेंबर..आज मराठी काव्यविश्वात मनसोक्त मुशाफिरी करणारे कवी सौमित्र उर्फ किशोर कदम यांचा वाढदिवस. किशोर कदम यांचा जन्म ९ नोव्हेंबर १९६७ रोजी झाला. काही माणसांच्या लोकप्रियतेचे रहस्य त्यांच्या कामाइतकेच व्यक्तिमत्त्वातही असते. ते किशोर कदम यांच्यातपण आहे. किशोर कदम यांना महाराष्ट्राचा लाडका कवी आणि नट म्हणता येईल. संवेदनशील कलावंत म्हणून सुद्धा किशोर कदम यांनी रसिकांच्या हृदयात स्थान निर्माण केले […]

अभिनेता व दिग्दर्शक सुबोध भावे

आज ९ नोव्हेंबर.. आज अभिनेता व दिग्दर्शक सुबोध भावेचा वाढदिवस. सुबोध भावे यांचा जन्म ९ नोव्हेंबर १९७५ रोजी झाला. मराठी सिनेसृष्टीतील एक चतुरस्त्र अभिनेता अशी सुबोध भावेची ओळख आहे. मालिका, नाटक आणि सिनेमांमधून त्याने सशक्त भूमिका साकारल्या. ‘अवंतिका’,‘वादळवाट’ आणि सध्या सुरू असलेली ‘का रे दुरावा’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय होत्या. लावणीवर आधारित असलेल्या ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही केलेले आहे. ‘बालगंधर्व’ […]

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व मा.पु.लं. चे काही किस्से

काळ बदलला, तशी माणसंही बदलली. स्पर्धेच्या जगात पाश्चात्त्य संस्कृतीचे वारे वाहू लागले. माणसं इंग्रजाळलेली झाली. अमेरिकन संस्कृती झपाट्यानं रुजू लागली. गणेशोत्सवाचा मूळ उद्देश दूर झाला आणि उत्सवाचं एकंदर स्वरुपच पालटलं. गणपतीच्या मिरवणुकीत चालणारे रोंबा, सोंबा, डिस्को नाच पाहून आणि प्रदुषणात भर घालणारी गाणी ऐकून ‘ पुलं ‘ गंभीर झाले. यावरची आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना ते एकदा […]

अंतु बर्वा

कोकणातल्या त्या मधल्या आळीतल्या ओसरीवर, भोवती माडाच्या काळ्या आकृती हलताना कंदिलाच्या प्रकाशात ती थकलेली सुकलेली तोंडे हे तत्वज्ञान सांगू लागली की काळीज हादरते. “अहो, समाजवादाच्या गफ्फा आहेत हो गफ्फा ! अहो, एक आंब्याचं पानदेखील नसतं हो दुसऱ्यासारखं. ब्रह्नदेवाच्या दरबारी प्रत्येक भांडं निराळं. सगळ्या माणसांची नशिबं सारखी होतील कशी ‘? घटकाभर धरा, तुमचा आला समाजवाद ! तो […]

1 50 51 52 53 54 211
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..