बहिणीची एक इच्छा
विसरू नकोस मजला माझ्या भाऊराया नाते अतूट असते घे, हे समजुनिया आठव सारे बालपण कसे गेले खेळांत भांडत होतो, रुसत होतो सारे केले प्रेमांत ओवाळणीची तुझी सुपारी ठेवली मी जपुनी आठवण होता तुझी मजला काढून बघते पेटीतुनी जाणीव आहे मजला संसार जीवनाची कर्तव्ये पडली शिरावरी तुझाच संसाराची खूप प्रेम दे वाहिनीला संसार कर सुखाने काढून ठेव अल्पसे प्रेम देण्या मज त्या साठ्यातुनी वर्षातून एके दिवशी बांध राखी प्रेमाची […]