आस्तित्व
जगण्या-मरण्याच्या पोकळीमध्ये जे दोन-चार क्षण आपल्या वाटयाला येतात त्याला आपण आयुष्य असं म्हणत असतो. पण कधी-कधी या आयुष्याची निरर्थकता स्पष्टपणे जाणवायला लागते. ‘We are thrown into the world’ या हायडेगरच्या वाक्याची सार्थकता जाणवायला लागते. कशासाठी खेळायचा हा खेळ? कशासाठी जगायचं? आई-वडिलांसाठी? बायकोसाठी? मुलांसाठी? देशासाठी? समाजासाठी? पण आई-वडिलांनी तरी का जगावं? मुलाने तरी का जगावे? देश तरी […]