नवीन लेखन...

वजन कमी करण्यासाठी उपास?

‘डायट’ हे आपल्याकडे गेल्या काही वर्षांत बरेच फोफावले फॅड आहे. ज्यूस डायट ते केटोजेनिक डायट असे विविध डायट प्रकार घाऊक दराने आढळून येतात. वजन कमी करण्यासाठी उपास करणे हा एक ‘अनोखा’ मार्ग काहीजण अवलंबतात. विशेषतः महिलावर्गात ही पद्धत फारच प्रसिद्ध आहे. “सध्या वेट ओब्सर्व्ह करतेय. डायटचा भाग म्हणून रात्री जेवत नाही.” असं वाक्य बऱ्याचदा कानावर पडत […]

किचन क्लिनीक – पालेभाज्या – पुदीना

पुदीन्याचा वापर आपण आपल्या स्वयंपाकामध्ये तसा सर्रास करत नसलो तरी देखील काही खास व्यंजनांमध्ये हा आपण हमखास वापरतो.हुॅं तोंडास पाणी सुटले ना ?समजले आम्हास आता ब-याच जणांना भैयाकडील पाणीपुरी,शेवपुरीची आठवण आली असणार.पुदिन्याची चटणी,वेगवेळी बिर्याणी,पुलाव,तसेच गोव्याचा खास पदार्थ चिकन अथवा फिश काफरियल (पापम् शांतम् ??श्रावण आलाय)ह्या सर्वांत ह्याचा हमखास वापर करतात. ह्याचे १-२ फुट उंचीचे सुंदर क्षुप […]

बाह्य अडथळे

एकाच दिशेने जातां, प्रभू मिळेल सत्वरी, रेंगाळत बसाल तर, गमवाल तो श्री हरी ।।१।। तुम्ही चालत असतां, अडथळे येती फार, चालण्यातील तुमचे, लक्ष ते विचलणार ।।२।। ऐष आरामी चमक, शरिराला सुखावते, प्रेम, लोभ, मोह, माया, मनाला ती आनंदते ।।३।। शरिराचा दाह करी, राग द्वेष अहंकार मन करण्या क्षीण, षड् रिपू हे विकार ।।४।। सुख असो वा […]

नवीन येणारी पुस्तके

छगन भुजबळ – अनुभव :- “बारामतीच्या करामती” विजय मल्ल्या :- “विश्व कर्जाचे – कर्ज तुमचे सल्ला माझा” शरदचंद्र पवार – व्यक्तिचित्रे :- “मी टिपलेली माणसे” निखील वागळे – नाटक :- “मालकाची जात अजित पवार – आत्मकथा- “स्वत:ची मोरी” कुमार केतकर – लघुकथा :- “अर्णब – एक दुःस्वप्न आणि इतर” राज ठाकरे – 1) “जाळाईदेवी माहात्म्य” (पोथी) […]

अत्तराच्या व्यापाऱ्याजवळ बसलो असता

अत्तराच्या व्यापाऱ्याजवळ बसलो असता त्याने काही दिले नाही दिले , तरी आपल्याला फुकटचा वास घेता येतो वा मिळतो. चांगल्या लोकांचा सहवास त्या अत्तराच्या व्यापाऱ्यासारखा आहे. त्यानं काही दिलं नाही, बोलला नाही, उपदेश दिला नाही, चमत्कार केला नाही, तरी त्याच्या देहातून-मनातून ज्या पवित्र लहरी वा स्पंदनं बाहेर पडतात त्यांनी आसपासचं वातावरण पवित्र झालेलं असतं. अशा वातावरणात राहिल्यानं […]

घरी उटणे कसे बनवाल ?

भारतातील प्रत्येक सणाला जोडून काही परंपरा आहेत. अशीच एक परंपरा आहे उटणे लावणे. दीपावलीतील अभ्यंगस्नानात उटण्याला विशेष महत्त्व आहे. उटण्याचे आयुर्वेदिक महत्वही आहेच. दिवाळीचा सण म्हणजे थंडीला सुरुवात. या काळात त्वचेची काळजी घ्यावी लागते. उटणे त्वचेसाठी उपयुक्त आहे. पूर्वी उटणे घरीच तयार करीत असत. आजकाल ही पद्धत मागे पडली आहे. दिवाळीच्या वेळेस बाजारात अनेक प्रकारची उटणी विकत […]

फोडणी देण्यासाठी तेलाचा वापर करावा का?

फोडणी देण्यासाठी तेलाचा वापर करावा का?! काहींना हा प्रश्न वाचून आश्चर्य वाटले असेल. फोडणीसाठी तेलच वापरले जाते हे आपल्या सगळ्यांना तोंडपाठ असलेले उत्तर. त्या तेलातही सोयाबीन वापरावे की सूर्यफूल अशा प्रश्नातच आम्ही बुडालेले असतो. मात्र मुळात फोडणीसाठी तेलच वापरावे का अन्य काही पर्याय आहे? याचा विचारदेखील आमच्या मनाला शिवत नाही. फोडणी देताना नेमकी काय प्रक्रिया होते? […]

सुप्त शक्ती

खोलीमध्ये कोंडूनी मांजर,  हाती घेई काठी  । मारून टाकण्यासाठी तीला,  लागला तो पाठी  ।। अतिशय भीत्री असूनी ती,  जीवासाठी पळे  । हतबल होता पळून जाण्या,  मार्ग तो ना मिळे  ।। उपाय नसता हाती कांहीं,  चमत्कार घडे  । सर्व शक्तीनी त्याच्यावरती,  तुटून ती पडे  ।। उडी मारूनी नरडे धरले,  दोन्ही पंजानी  । मृत्यूचाच तिने गळा घोटला, शक्ती […]

1 68 69 70 71 72 211
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..