दिन दिन दिवाळी…
दिन दिन दिवाळी… गायी म्हशी ओवाळी… वसु बारसला ।।१।। दिन दिन दिवाळी… आरोग्य सांभाळी… धन त्रयोदशीला ।।२।। दिन दिन दिवाळी… दुःखाला पिटाळी… नरक चतुर्दशीला ।।३।। दिन दिन दिवाळी… लक्ष्मीला सांभाळी… अश्विन अमावस्येला ।।४।। दिन दिन दिवाळी… नववर्षाची नवाळी… बळी प्रतिपदेला ।।५।। दिन दिन दिवाळी… भावाला ओवाळी… यम द्वितियेला (भाऊबीज) ।।६।।