नवीन लेखन...

शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्ती

आज २४ ऑक्टोबर. आज अनेक ख्यातनाम गायकांच्या कौतुकाचा विषय ठरलेली शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्तीचा वाढदिवस. कौशिकीचा जन्म २४ आक्टोबर १९८० रोजी झाला. पं. अजय चक्रवर्ती यांच्या त्या कन्या. पतियाळा घराण्याचे गायक पंडित अजय चक्रवर्ती, आई चंदना चक्रवर्ती संगीत शिक्षक, घरातच गाणे, वयाच्या २ र्‍या वर्षापासून तिने संगीत शिकण्यास सुरूवात केली. ऋतुपर्ण घोष या प्रसिद्ध बंगाली दिग्दर्शकाने [‘रेनकोट, चोखेर बाली’] देवू केलेल्या प्रमुख नायिकेच्या […]

किचन क्लिनीक – पालेभाज्या – करडई

हे बहुवर्षायू क्षूप असते. हि भाजी चवीला गोड,तिखट,भूक वाढविणारी व उष्ण असते.हि भाजी शरिरातील वात व कफ दोष कमी करते व पित्त दोष वाढविते. हि भाजी जेवणात तर वापरतात तशीच ती घरगुती औषध उपचारात देखील वापरली जाते. आता हिचे औषधी उपयोग पाहूया. १)सर्दी झाल्यास करडईच्या कोवळ्या पाल्याची भाजी द्यावी. २)ह्या भाजीचा पोटीस सुजेवर बांधल्यास सुज व वेदना […]

आपल्या शरीरावरील तीळ

शरीरावर जन्मतःच जे छोटे-छोटे काळे ठिपके असतात त्यांना तीळ म्हणतात. तिळाला मस असेही म्हणतात. मेलॅनीन हे रंगद्रव्य असलेल्या पेशींपासून तीळ तयार होतात. काहींच्या जन्मापासूनच शरीरावर तीळ असतात आणि त्यामुळे त्यांना ‘जन्मखूण’ मानतात. परंतु बऱ्याचदा हे तीळ लहान वयात, पौगंडावस्थेत किंवा गरोदरपणात शरीरावर वाढू शकतात. बहुधा वाढत्या वयाबरोबर ते दिसेनासे होतात. शरीराच्या कोणत्याही भागावर तीळ वाढू शकतात. […]

आत्म गुरू

गुरूचा महीमा थोर | उघडूनी जीवनाचे द्वार सांगूनी आयुष्याचे सार | मार्ग दाखविती तुम्हां  १ वाटाड्या बनूनी | भटकणे थांबवूनी मार्गासी लावूनी | ध्येय दाखवी तुम्हां  २ न कळला ईश | न उमगले आयुष्य दु:ख देती जीवन पाश | बिना गुरू मुळे  ३ अंधारातील पाऊल वाट | ठेचाळण्याची शक्यता दाट प्रकाशाचा किरण झोत | योग्य रस्ता […]

डेंगू आणि इतर ताप

मित्रांनो सध्या तापाची साथ जोरात सुरु आहे. लहान बाळापासून वयस्कर माणसांपर्यंत सर्व जण तापाने आजारी आहेत व दवाखान्याच्या खेपा घालत आहेत. दोन तीन दिवस औषध,injection, saline लावून देखील ताप कमी जास्त होत राहतो.मग तुमचा डॉक्टर रक्त तपासायला सांगतो,ज्यात प्लेटलेट कमी झाल्याचे समजते किंवा डेंगू ची टेस्ट positive येते. ह्यावर हॉस्पिटल मध्ये ऍडमिट व्हायचा सल्ला मिळतो. घाबरलेला […]

मंगला बर्वे

अन्नपूर्णा या पाकशास्त्रावरील प्रसिद्ध पुस्तकाच्या लेखिका मंगला बर्वे यांचे काल रात्री (२३ आक्टोबर) निधन झाले. अन्नपूर्णा, इच्छाभोजन, मांसाहारी, चायनीय पदार्थ तसेच खाद्य पदार्थांवरची विविध छोटी छोटी पुस्तके, डोहाळे बारसे, रुखवताचे पदार्थ, लोकरीने विणून केलेली खेळणी अशी अनेक पुस्तके प्रसिद्ध होती. मागील पिढीतील नावाजलेले लेखक अच्युत बर्वे यांच्या त्या पत्नी होत.

गोवत्स द्वादशी अर्थात वसुबारस

आश्विन कृष्ण द्वादशीला गोवत्स द्वादशी म्हणतात. यालाच ‘वसुबारस ‘ असे नांव आहे. समुद्रमंथनातून पाच कामधेनू निर्माण झाल्या. त्यातील नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे. या दिवशी स्त्रिया एकभुक्त राहून सायंकाळी सवत्स धेनूचे पूजन करतात. तिची प्रार्थना करतात. हे सर्वात्मिके आणि सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिनी माते, तू माझी मनोकामना सफल कर. गोडधोड करून तिला खाऊ […]

प्रदूषणाचा नरकासूर

दिवाळी अजून यायची आहे. पण त्यापूर्वीच्या गणपती आणि नवरात्राच्या प्रदूषणाचे दोन बळी माझ्याकडे औषधाला आले. एक पस्तीस वर्षाचा तरुण, दिवसभर गणपतीच्या मंडपात बसला होता. डाव्या बाजूला ढणाणा स्पीकर चालू होता. दुसऱ्या दिवशी कळलं की त्या कानानं ऐकू येत नाहीये. तपासण्या वगैरे झाल्या. डॉक्टरांनी हात टेकलेत. दुसरा तीस वर्षाचा तरुण. देवीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत दहाहजार फटाक्यांची माळ यानंच […]

आहारातील बदल-शाकाहार भाग ८

शाकाहारी जेवणामधे प्रमुख घटक कोणता? भात किंवा भाकरी. प्रदेशानुसार ठरते भाकरी किंवा पोळी ते. ज्या प्रदेशात तांदुळ हे पिक असते, तेथील आहारात भात हा मध्यवर्ती असतो. बाजुला पोळी असते. आणि जिथे तांदुळ हे मुख्य पिक नाही, तिथे भात मुख्य नाही. तो नंतर वाढून घेतला जातो. पहिल्या वाढीला भाकरी किंवा रोटी आली तर ती मध्यवर्ती आहार ठरते. […]

केरसी लॉर्ड

आज केरसी लॉर्ड यांचे निधन झाले. जन्म:- १४ फेब्रुवारी १९३५ केरसी लॉर्ड यांची माहिती ज्येष्ठ आणि श्रेष्ठ तालवादक मा.लॉर्ड कॉवस हे मा.केरसी लॉर्ड यांचे वडील. मा.केरसी लॉर्ड यांचे संपूर्ण कुटुंब संगीत या विषयात होते. १९३१ साली प्रदर्शित झालेल्या ‘आलम-आरा’ पासून १९९० सालापर्यंतच्या विविध संगीतकारांकडे लॉर्ड कुटुंबीयांनी वेगवेगळी भारतीय आणि पाश्चिमात्य वाद्यं वाजविली आहेत. सचिन देव बर्मन […]

1 73 74 75 76 77 211
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..