अमेरिकेतील वन्यप्राणी जीवन – भाग ३
एकोणिसावं शतक सुरू झालं त्यासुमारास अमेरिकेचे स्थूल मानाने तीन विभाग होते. एक म्हणजे पूर्व किनारपट्टी, जी पूर्णपणे प्रस्थापित आणि बहुतांशी सुरक्षित होती, दुसरा म्हणजे ऍपेलेशियन पर्वतराजीपासून पश्चिमेला मिसीसीपी नदीपर्यंतचा प्रदेश, जो गेल्या शे – सव्वाशे वर्षांतल्या धाडसी लोकांच्या मोहीमांमुळे परिचित होऊ लागला होता आणि तिसरा म्हणजे मिसीसीपीच्या पलीकडचा प्रचंड मोठा असा (गोर्या लोकांना) पूर्णपणे अनभिज्ञ असा […]