अमेरिकेतील वन्यप्राणी जीवन – भाग २
ऍपेलेशियन पर्वतराजीची नैसर्गिक हिरवी भिंत अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीला पलीकडे पसरलेल्या जंगल, दर्या आणि माळरानांपासून वेगळं करते. सुरवातीला अटलांटिक महासागर ओलांडून येणार्या निर्वासितांनी अमेरिकेच्या पूर्व किनार्यावर आपल्या वसाहती स्थापन केल्या. ऍपेलेशियन पर्वतराजीची नैसर्गिक सीमारेषा हीच सुरवातीच्या वसाहतीसाठी विस्ताराची लक्ष्मणरेषा होती. परंतु या अगदी सुरवातीच्या काळापासूनच काही अस्वस्थ, धडपड्या, साहसी लोकांना या नैसर्गिक सीमेच्या आत स्वत:ला बंदिस्त करून […]