अर्पण
आशिर्वाद श्री जगदंबेचा, सहवास तुझ्या स्फूर्तीचा रचिली ओवीबद्ध कथामाला, ती अर्पितो मी तुजला १ विचारांच्या उठल्या लहरी, शब्द जुळता काव्या परी कविता रूप धारण करी, ती अर्पितो मी तुजला २ प्रभूचा असावा सहवास, हीच अंतर्मनातील आंस विचारांची घालूनी शब्दरास ती अर्पितो मी तुजला ३ प्रभू नसे जन्ममरण व्यथा, अवतारास संबोधूनी जन्मकथा भावनेस व्यक्त करी कविता, ती […]