मुंबईचा काळा घोडा
इतिहासावर महानगरपालिकेचं अतिक्रमण..! काल बऱ्याच दिवसांनी फोर्ट विभागातील ‘काळा घोडा’ इथं जाणं झालं. तिथं गेलो आणि चमकलोच. जहांगीर आर्ट गॅलरीच्या दारातल्या पार्कींग लांटमधे उंची गाड्याच्या पार्कींगच्या गर्दीत एका उंचं चबुतऱ्यावर चक्क एक काळ्या रंगाचा घोडा ‘पार्क’ केलेला दिसला. मला आश्चर्यच वाटलं. इथे घोडा पार्क कधी आणि कोणी केला हे कळेना म्हणून चबुतऱ्यावरची पाटी वाचण्यासाठी आणखी जवळ […]