MENU
नवीन लेखन...

जग आणि जग..

हसून सोडून देण्यापलीकडे ह्या जगाची फारशी मोठी लायकी नाही..जगाला गांभिर्याने घेतलं की मग हे जग आपलं सरळ जगणंही उगाचंच गंभिर आणि क्लिष्ट करून टाकते.. शेवटी जग म्हणजे कोण, तर आपल्याला जी चार लोकं ओळखतात तेच आपल्यासाठी जग असतं..ही चार-दहा लोकं सोडली तर आपण कसे आहोत व काय करतोयत या विषयी इतर कुणाला काहीच कर्तव्य नसतं..पण आपण […]

प्रमुख आहार सूत्र – भाग ९

दुधाचा विषय सुरू असल्याने त्यानंतरचा बनणारा पदार्थ म्हणजे दही. प्रमेह होऊ नये म्हणून जो श्लोक आधी वर्णन केला आहे, त्यातील पहिल्या ओळीतला शेवटचा शब्द, दधिनी. खरंतर दुधानंतर दही बनते, पण शास्त्रकारांनी त्याच्यासाठी मानाचे स्थान निर्माण करून श्लोकात दुधाच्याही आधी बसवले. एवढे विशेष लक्ष देण्यासारखा हा आंबट पदार्थ साखरेच्या आजाराचे कारण असू शकतो ? वरवर पहाता, हे […]

वात, पित्त आणि कफ

‘वात’, ‘पित्त’ आणि ‘कफ’ हे शब्द आयुर्वेदाच्या संदर्भात नेहमी ऐकलेले असतात. वात, पित्त आणि कफ हे तीन ‘दोष’ समजले जातात. दोषाधिक्यानं बनलेल्या ‘प्रकृती’ला आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. जन्माला येतानाच आपण ज्या प्रकारची प्रकृती घेऊन येतो, ती आयुष्यभर बदलत नाही. माणसाची शरीरयष्टी, शारीरिक गुण, स्वभाव, आवडीनिवडी हे सगळं प्रकृतीवर अवलंबून असतं, असं आयुर्वेद मानतो. अर्थात तुमची प्रकृती […]

पाठदुखी

पाठदुखी हे एक लक्षण आहे, शरीरातल्या बिघाडाचे सूचक चिन्ह आहे. हा बिघाड क्वचित गंभीर स्वरूपाचाही असू शकतो. अर्थातच पाठदुखीवर फक्‍त वेदना कमी करणे इतका मर्यादित स्वरूपाचा उपचार करणे अयोग्य ठरते, तर नेमके कारण काय आहे हे शोधून त्यानुसार नेमके उपचार करणे आवश्‍यक असते. पाठदुखी व कंबरदुखीचा अनुभव प्रत्येकाने घेतलेला असतो, दुखण्याची तीव्रता कमी अधिक असली तरी […]

अशी घ्या केसांची निगा

१) आवळा, शिकेकाई, रिठा हे सर्व २०० ग्रॅम घेउन एकत्र पाण्यात उकळावे. थोडा कापुर मिसळावा आणि शाम्पुसारखे हे पाणी डोके धुण्यास वापरावे. २) उरलेली चहापावडर एका ग्लासमध्ये स्वछ पाण्यात रात्रभर भिजत ठेवावी. सकाळी पाणी गाळून त्यात लिंबु पिळवा हे पाणी शाम्पुसारखे वापरावे. ३) कडुनिबांची पाने पाण्यात उकळुन त्याने केस धुवावेत. त्यामुळे केस मजबुत तर होतातच शिवाय […]

रतन साळगावकर ऊर्फ हंसा वाडकर

चित्रपटसृष्टीतील पहिली ग्लॅमरस नायिका म्हणजे हंसा वाडकर. त्यांचा जन्म २४ जानेवारी १९२४ रोजी झाला. सौंदर्य, नृत्य आणि अभिनय या तिन्ही आघाड्यांवर परिपूर्ण असणाऱ्या या नायिकेनं दोन दशकं गाजविली. हंसाबाईंनी आपल्या कारकिर्दीत मोजकेच चित्रपट केले. परंतु, त्यातील त्यांच्या भूमिका आणि पडद्याबाहेरच्या बेफाम वागण्यानं त्या प्रेक्षकांच्या सदैव लक्षात राहिल्या. हंसाबाईंचं आयुष्य एवढं जबरदस्त होतं की श्यायम बेनेगलांच्या विख्यात दिग्दर्शकाला त्यांच्यावर “भूमिका’सारखा […]

महान गायक भीमसेन जोशी

भीमसेन जोशींचे वडील शिक्षक होते. त्यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९२२ रोजी झाला. भीमसेन यांचा संगीताकडे असलेला ओढा त्यांना पसंत नव्हता. भीमसेना यांनी वैद्यकीय अथवा अभियांत्रिकी शिक्षण घ्यावे असा त्यांचा आग्रह होता. या मतभेदांमुळे अखेर भीमसेनांनी घर सोडण्याचे आणि त्याकाळी शास्त्रीय संगीतासाठी ख्यातनाम असलेल्या ग्वाल्हेर, लखनौ, रामपूर या शहरांपैकी एका ठिकाणी जाण्याचे ठरविले. व १९३३ साली वयाच्या अकराव्या वर्षी घर सोडले […]

आधुनिकता

नवलाईचे विश्व सारे,  नवलाईतच जगते  । आगळ्याच्या शोधामध्यें,   नव-नवीन इच्छीते  ।। ताजे वाटते आज जें,   शिळे होई उद्यांच ते  । प्रवाही असूनी जीवन,   बदल घडवीत जाते  ।। मुल्यमापन बदलांचे,   संस्कारावरी अवलंबूनी  । परिस्थीतीच्या भोवऱ्यामध्यें,  विचार फिरे क्षणोंक्षणीं  ।। मुळतत्व ते राही कायम,   आकार घेई जसा विचार  । ताजा शिळा भाव मग तो,   ठरविला जाई वेळेनुसार  ।। […]

पार्श्वगायिका कविता कृष्णमूर्ती

कविता कृष्णमूर्ती हिंदी बॉलीवूड गाण्याबरोबरच इंडिपॉप गाणी, उडत्या चालीची हिंदी गाणी ही गातात. कविता कृष्णमूर्ती यांचा जन्म २५ जानेवारी १९५८ रोजी झाला. त्या दिल्लीत राहत होत्या आणि वयाच्या १४ व्या वर्षी मुंबईला आपल्या बंगाली मावशीकडे आल्या. त्यांना पार्श्वगायिका बनवण्याची मावशीचीच खूप इच्छा होती. कविता कृष्णमूर्ती यांनी लक्ष्मीकांत-प्यारेलाल, खय्याम, राहुल देव बर्मन, ए. आर. रहमान, जतीन ललित, रवींद्र जैन यांसारख्या ज्येष्ठ […]

नाव असे अजरामर होते

गौतम बुद्धाने बौद्ध धर्म स्थापन केल्यानंतर असंख्य लोक या नव्या धर्माकडे आकर्षित झाले. हळूहळू गौतम बुद्धाचा शिष्यपरिवार वाढत गेला. प्रत्येक शिष्याला वाटे स्वतः गौतम बुद्धांनी आपल्याला काही तरी काम सांगावे. एका शिष्याला स्वतःच्या नावाचा फार अभिमान होता. ते लक्षात घेऊन गौतम बुद्धांनी एकदा त्याला ‘तू तुझे नाव अजरामर कर’ अशी आज्ञा केली. त्याप्रमाणे तो शिष्य स्वतःचे […]

1 5 6 7 8 9 43
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..