नवीन लेखन...

सहृदयता हवी

थोर तत्त्वज्ञ कन्फ्युनिअस याची साधी राहणी व उच्च विचारसरणी हे खास वैशिष्ट्य होते. त्याला बासरी वाजवायचा फार नाद होता. अनेकदा तो बासरी वाजवत एका गावाहून दुसऱ्या गावाला जात असे. पैसा आणि संपत्तीपेक्षा त्याला मानवता जास्त प्रिय होती. त्यामुळे साहजिकच त्याच्याजवळ फारसा पैसा नव्हता. त्याची त्यालाही कधी खंत वाटली नाही. एकदा कन्फ्युनिअस असाच एके ठिकाणी बासरी वाजवत […]

प्रमुख आहार सूत्र – भाग ८

बालकांसाठी मातृस्तन्य सर्वोत्तम. आईचे नसेल तर दायीचे. नसेल तर गाईचे ! त्याच्यापुढे जाऊन म्हैशीचे दूध प्यायले तर कफ आणखीनच वाढेल. म्हणजे तेही नको. अजूनही काहीजणांना नेमकेपणाने कळले नाही. दूध प्यावे की नाही ? प्यावेतर दूध कधी प्यावे ? खरं सांगायचं तर आयुर्वेदीय दिनचर्येमधे तर सकाळी चहा पण नाही आणि दूध पण नको. दिनान्ते म्हणजे सायंकाळी चालेल. […]

नम्रतेची किंमत

अंगात नम्रता, विनयशीलता असली, की आपले कोणतेही काम सुकर होतेच. शिवाय आपलेही महत्त्व वाढते. नम्रतेची किंमत किती आणि कशी असते या संदर्भात एक गोष्ट सांगितली जाते… एक राजा एकदा त्याच्या प्रधानासह राजधानीचा फेरफटका मारायला निघाला. हा राजा खरोखरच अतिशय नम्र व प्रजाहितदक्ष होता. प्रजेची काळजी घेण्यात तो कोठेही स्वतःला कमीपणा मानत नसे. प्रधान आणि इतर मंत्रिजनांबरोबर […]

मान्य मला ती सजा, प्रभु तु देशी

मान्य आहे मजला वाल्या कोळी बनणे खून लागल्याचा डाग लागला परी उद्धरुन जाणें ।।१।। लुटालूट करुनी देह वाढविला राम नाम जपूनी पावन तो झाला  ।।२।। प्रभू कृपा होऊनी महा कवी बनला वाल्मिकी ऋषी बनूनी रामायण ग्रंथ रचिला  ।।३।। वाहून गेला पाप भाग तप प्रवाहाच्या वेगांत धुवूनी गेला डाग जलाशयाच्या ओघांत  ।।४।। वाईट घटना घडते त्यास भोग […]

नदीपार

ब्रह्मदेशाचा (सध्याचा म्यानमार) राजा बोडायाया हा विशेष प्रसिद्ध होता. तो कुशल प्रशासक तर होताच, पण त्याचे सैन्यही बलाढ्य होते. त्याचे राज्य सर्वात बलिष्ठ समजले जाई. या शूर राजाचे अंतःकरण दयाळू होते. त्याने अनेक पॅगोडे बांधले आणि देशभरातील धर्मगुरूंची बडदास्त राखली. बालपणाच्या मित्रांचीदेखील त्याने चांगली दखल घेतली. यु पॉ हा त्याचा मित्र. त्याच्याबरोबर एकाच धर्मगुरूकडे तो सहाध्यायी […]

शनिवारवाड्याच्या वास्तुशांतीला २८५ वर्षे

मराठी दौलतशाहीची शान असलेल्या आणि अटकेपार झेंडा फडकविणाऱ्या कर्तबगार पुरुषांची मालिका पाहण्याचे भाग्य लाभलेल्या शनिवारवाडय़ाच्या वास्तुशांतीला २२ जानेवारी रोजी २८५ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने शनिवारवाडय़ाची माहिती. पराक्रमी थोरले बाजीराव पेशवे यांनी माघ शुद्ध तृतीया या तिथीला (शके १६५१) म्हणजेच १० जानेवारी १७३० रोजी भूमिपूजन करून शनिवारवाडय़ाच्या बांधकामाचा प्रारंभ केला. त्या दिवशी शनिवार होता. पहिल्या टप्प्याचे […]

सदैव नामस्मरण

प्रभूनाम मुखीं होते रामतिर्थांच्या सदा  । ऐकू आले तेच निद्रेत असता एकदा  ।। चमत्कार दिसून आला एके दिवशी  । राम नामाचे ध्वनी उमटती देहापाशी  ।। विज्ञानाने उकल केली या घटनेची  । खात्री करिता सत्यता पटली याची  ।। चेतना मिळता स्वर यंत्रात ध्वनी उमटे  । त्याच ध्वनीच्या विद्युत लहरींनी शब्द फुटे  ।। शब्दांचे वलय फिरती देहाभोवती  । […]

बाळासाहेब ठाकरे

बाळासाहेबांचा जन्म २३ जानेवारी १९२६ रोजी झाला. बाळासाहेब ठाकरे यांचे वडील केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार त्या काळात आपल्या लेखनातून, वक्तृत्वातून तसेच कार्याच्या माध्यमातून लोकजागरणाची धुरा सांभाळत होते. प्रबोधनकार अन्यायकारक रूढी-परंपरांवर व जातिभेदात्मक वर्णव्यवस्थेवर कडाडून हल्ला चढवत होते. तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचे योगदानही महत्त्वपूर्ण होते. प्रबोधनाचा, पुरोगामी विचारांचा व आक्रमक वृत्तीचा प्रबोधनकारांचा वारसा बाळासाहेबांमध्ये ही कळत-नकळतपणे उतरला. सर्वप्रथम […]

आग्रा घराण्याचे गायक पं.दिनकर कैकिणी

वयाच्या सातव्या वर्षी दिनकर कैकिणी यांनी एका संगीत सोहळ्यात उस्ताद अल्लादिया खान, उस्ताद फैय्याज खान व उस्ताद अब्दुल करीम खाँ या तीन संगीत दिग्गजांचे गाणे ऐकले. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १९२७ रोजी झाला. उस्ताद फैय्याज खानांचे गाणे ऐकल्यावर ते इतके प्रभावित झाले की त्यांनी तिथेच संगीत कलेची साधना करण्याचा व फैय्याज खानांच्या गायनशैलीला आत्मसात करण्याचा निश्चय केला. त्यांचे प्रथम […]

नेताजी सुभाषचंद्र बोस

नेताजी सुभाषचंद्र बोस हे इतके महान व्यक्तिमत्व आहे की ‘भारताला स्वातंत्र्य कशामुळे/कुणामुळे मिळाले ? या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेतल्यास सर्वात पहिले नाव जर कुणाचे येईल तर ते नेताजींचेच. त्यांचा जन्म २३ जानेवारी १९१५ रोजी झाला. “हम सब मिलकर आगे बढेंगे, तो सिध्दी प्राप्त होगी ही | हम अपनी दृष्टी को जितनी अधिक ऊपर की तरफ उठायेंगे ,उतना ही हम भुतकाल […]

1 6 7 8 9 10 43
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..