मराठी कवी व गीतकार कवी संजीव
कवी संजीव यांचे नाव कृष्ण गंगाधर दीक्षित. आपल्या लहानपणी वडिलांचे छत्र हरवलेले संजीव त्यांच्या काकांच्या घरी वाढले. त्यांचा जन्म १२ एप्रिल १९१४ रोजी सोलापुराजवळील ‘वांगी’ गावात झाला.त्यांचे शालेय शिक्षण सोलापुरात झाले. पुढे कलाशिक्षणाकरता त्यांनी मुंबईच्या ‘बाँबे स्कूल ऑफ आर्ट’ या संस्थेत प्रवेश घेतला. तेथून १९३९ साली ते जी.डी. आर्ट पदविका परीक्षा उत्तीर्ण झाले. मा.संजीव व्यवसायाने छायाचित्रकार व मूर्तिकार […]