नवीन लेखन...

प्रामाणिकपणाचे फळ

तुरुंगातील कैद्यांची पाहणी करण्यासाठी शासनाने एक समिती नियुक्त केली होती. एक निवृत्त न्यायाधीश त्या समितीचे प्रमुख होते. या समितीने तुरुंगात जाऊन तेथील कैद्यांची पाहणी सुरू केली. सहज कुतूहल म्हणून समितीच्या प्रमुखांनी काही कैद्यांना त्यांनी कोणता गुन्हा केला व त्याला का शिक्षा झाली याची चौकशी करायला सुरुवात केली. एक कैदी म्हणाला, मी खरे तर कोणताच गुन्हा केला […]

किचन क्लिनीक – काही दह्यांचे गुणधर्म व दह्याचे घरगुती उपचार

१)गाईच्या दुधाचे दही: चवीलागोड,आंबट,उष्ण,स्निग्ध,बलकारक, पुष्टिकर,भुक वाढविणारे व अजीर्णात उपयुक्त आहे. २)म्हशीच्या दुधाचे दही: चवीला गोड,आंबट,पचायला जड,स्त्राव उत्पन्न करणारे,स्निग्ध,वातनाशक,कफकर,रक्तदुषित करणारे,शुक्र व वजन वाढविणारे आहे. ३)शेळीच्या दुधाचे दही: मल अर्थात संडासलाघट्टकरणारे,हलके त्रिदोषनाशक,भुक वाढविणारे,वजन वाढविणारे आहे. आता आपण दह्याचे काही घरगुती उपचार पाहूयात: १)कुळीथाचे अजीर्ण झाले असता ताजे दही कपड्यात बांधून टांगून ठेवावे व त्याचे निथळणारे पाणी प्यावे. २)भुक लागते पण […]

पुरुषाचं दुखणं कुठे कोणाला समजतं?

अनेकदा आपण स्त्रीबद्दल वाचतो पण पुरुषाच दुख कधीच कोणाला समजत नाही.  त्याचे दुख जरी कोणाला समजले तरी त्याच्याविषयी कोणीच बोलत नाही. अशीच प्रत्येक पुरुषाची व्यथा सांगणारी ही कविता.  

मोक्ष आणि शांतीचा मार्ग

भगवान युद्ध सत्य, अहिंसा आणि मोक्षमुक्तीचा मार्ग कसा मिळवायचा याची लोकांना शिकवण देत देत एका गावात आले. त्यांना भेटण्यासाठी एक माणूस आला. बुद्धांना म्हणाला की, तुम्ही तुमच्या धर्माद्वारे सत्य, अहिंसा आणि मोक्षप्राप्तीचामार्ग सांगत आहात. परंतु मला सांगा, तुमची शिकवण ऐकून किती लोकांना मोक्षप्राप्ती झाली किंवा मुक्ती मिळाली. गौतम बुद्धांनी त्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले व ते […]

माना न माना !

हजारो वर्षाचा काळ चालत आहे व पुढे चालत राहील. हे एक सत्य आहे. ही पृथ्वी हे आकाश, वायू मंडळ, हे तेज पाणी ज्याना पंचमहाभूते म्हणून संबोधले गेले आहे. ह्यातून त्याचा कर्ता करविता ईश्वर असावयास हवा ही संकल्पना पूढे आली. जीव सृष्टीचे पसरलेले अथांग रुप प्रत्येकजण जाणतोच आहे. अनेक जीवसृष्टीचे घटक दिसले. जसे प्राणीजीव, वनस्पतीजीव. ह्याच्या संख्या […]

शारदेस विनंती

हे शारदे ! रूसलीस कां तू,  माझ्या वरती  । लोप पावली कोठे माझी,  काव्याची स्फूर्ती  ।। दिनरात्रीं तव सेवा केली,  मनोभावें  । कळले नाहीं आज शब्द ओठचे,  कोठे जावे  ।। दिसत होते भाव मजला,  साऱ्या वस्तूमध्यें  । उचंबळूनी जाई मन तेव्हां,  नाचत आनंदे  ।। तेच चांदणे तारे गगनी,  आणिक लता वेली  । पकड येईना टिपण्या सौंदर्य, […]

किचन क्लिनीक – दही खायचे नियम

आपल्या पैकी बरेच जण आवडते म्हणून दही मिळेल त्यावेळेस हवे तसे खात असतो आणी कधी कधी तर आपल्या लक्षात देखील येत नाही की आपल्याला सतावणाऱ्या एखाद्या तक्रारीचे मुळ कारण आपण खात असलेले हे दहीच आहे म्हणून. तर मग दही कधी खाऊ नये ह्याचे काही नियम आयुर्वेद सांगते ते आपण पाहूयात: १)दही रात्रीच्या वेळेस मुळीच खाऊ नये. […]

सत्य आणि निर्भयता

फार वर्षापूर्वी इराकमध्ये घडलेली ही घटना आहे. बगदादजवळील एका छोट्या गावी एकमहिला व तिचा लहान मुलगा राहत होते. ती महिला मोलमजुरी करून आपल्या मुलाचे संगोपन करीत होती. आपल्या मुलाने शिकून मोठे व्हावे हीच तिची प्रामाणिक इच्छा होती. परंतु त्या छोट्या गावात तो मुलगा किती शिकणार? म्हणून तिने त्याला बगदादला शिक्षणासाठी पाठविण्याचे ठरविले.खरे तर त्या मुलाला आईला […]

वळून पहा

उडून गेली दूर दूर तू झेप घेउनी आकाशी बघू लागलो चकीत होऊनी पंखामधली भरारी कशी नाजूक नाजूक पंखाना आधार होता मायेचा चिमुकल्या त्या हालचालींना पायबंध तो भीतीचा क्षणात आले बळ कोठून विसरुनी गेलीस घरटे आपुले बंधन तोडीत प्रेमाचे आकाशासी कवटाळले कधीतरी उडणे, आज उडाली बघण्या साऱ्या जगताला किलबिल करून वळून पहा दाणे भरविल्या चोचीला डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

गझलसम्राज्ञी

बिहारमध्ये आलेल्या भयानक पुराने असंख्य नागरिकांचे जीवन उध्वस्त झाल्यामुळे व्यथित झालेल्या एका मुलीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आपण काहीतरी केले पाहिजे हा ध्यास घेतला. स्वतःच पुढाकार घेऊन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी म्हणून एका संगीत मैफलीचे आयोजन केले. या संगीत मैफलीत येण्याचे अनेक मान्यवर गायक तसेच वादकांनी मान्य केले होते. मात्र ऐनवेळी त्यांच्यापैकी कोणीच फिरकले नाही. मात्र ही मुलगी मुळीच विचलित […]

1 13 14 15 16 17 28
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..