जीवन प्रवाह
जगणे अजून मजला साराच खेळ वाटे जरी वाढलो वयाने ही हार जीत वाटे येता अजूनि वारा प्रणयाची झिंग चढते पावसात चिंब भिजता स्पर्शाची ओढ वाटते नात्यातले दुरावे कितिदा दिले पुरावे खंतावलो तरीही संबंध गोड वाटे असता असे जरीही निर्ल्लज जीव जगतो आपुल्याच घरकुलाला तो बंदिशाला म्हणतो एकदा तरी दिसावी सत्याची ज्योत स्वप्नी आयुष्य शेवटी मी उधळीन दो हातांनी