पाय मुरगळणे
हल्ली जीवनशैली कमालीची व्यस्त बनली आहे. सतत धावपळ हा आजच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनला आहे. अशावेळी कितीही काळजी घेतली तरी काही अपघात घडतात. यामध्ये एक म्हणजे पाय मुरगळणे. काही वेळा चालताना, पायर्या उतरताना पाऊल किंचित तिरके पडते आणि पाय मुरगळतो. पाय मुरगळतो तेव्हा पायातील सांध्यांच्या दोन हाडांना जोडणार्याि उती अर्धवट फाटतात किंवा काही वेळा पूर्णही फाटतात. […]