नवीन लेखन...

नोटा बदली आणि अटलजी 

८ नोव्हेंबर २०१६ च्या रात्री ८ च्या सुमारास विद्यमान पंतप्रधान माननीय श्री . नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी चलनात असणाऱ्या ५०० आणि १००० रुपयांच्या चलनी नोटांची त्या मध्यरात्री पासून कायदेशीर मान्यता संपुष्टात येईल असे जाहीर केले . आणि ती संपुष्टात आलीही . नंतरच्या काळात आधी अस्तित्वात नसलेल्या २००० रुपयांच्या नोटा चलनात आणल्या गेल्या .  ५०० रुपयांच्या नवीन […]

जरा याद करो कुर्बानी- परमवीर चक्राने सन्मानित कॅप्टन करमसिंग

23 मे 1948 रोजी रिचमर गली व टीथवाल या रणक्षेत्रावर हिंदुस्थानी फौजांनी तिरंगा फडकवला. या पराभवामुळे जायबंदी झालेल्या पाकी फौजेने एक अरेरावी ब्रिगेड उतरवून टीथवाल मधून श्रीनगर पर्यंत मुसंडी मारायची असा व्यूह रचला. 13 ऑक्टोथबर 1948 या ईदच्या मुहूर्तावर रीचमर गलीवर प्रचंड सैन्य उतरवले. पहिला हल्ला तोफेच्या धडका देत झाला. तो करमसिंग यांच्या गस्ती पहारा ठाण्यावर. […]

मराठीतल्या पहिल्या स्त्रीवादी लेखिका मालती बेडेकर

मालतीबाई बेडेकरांचे माहेरचे नाव बाळुताई खरे होते. त्यांचा जन्म १८ मार्च १९०५ आवास, रायगड येथे झाला. विश्राम बेडेकरांशी १९३८ साली त्यांचा विवाह झाला. त्या आपले लिखाण विभावरी शिरुरकर ह्या नावाने प्रसिद्ध करायच्या. ‘महिला सेवाग्राम’शी संबंधित असताना अनेक अनाथ, विधवा, परित्यक्तांच्या समस्या त्यांनी अनुभवल्या -अभ्यासल्या. सह्रदयतेनं त्यावर मार्ग काढण्याचाही प्रयत्न केला. यातून दु:खी स्त्रीजीवनाशी त्यांचा जवळून परिचय झाला. या […]

जाहिरातींचे मायाजाल

जो खोटे बोलतो तो सर्वात मोठ्याने ओरडून सांगतो, हा मानसिकतेचा नियम आहे. चोवीस तास टीव्ही व रेडिओ वर साबण, तेल, सुंदर दिसण्याची क्रीम, शीतपेय, टूथपेस्ट, यांच्या हास्यास्पद जाहिराती आपल्याला दाखवतात यातून आम्ही काय बोध घ्यावा हेच समजत नाही. आजकाल हिंदी चित्रपटातील हिरो शितपेयातील जाहिरातीत सुपरमॅन सुद्धा न करू शकणारे स्टंट करून दाखवतात व शेवटी शीतपेय पिताना […]

इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग पाच

आतापर्यंत मनापासून खाल्लेले अन्न तोंडात आलेले आहे. असे गृहीत धरू. धान्यापासून आपण अन्न रूपांतरीत केले, आपल्या जीभेला, मनाला, शरीराला हवे तसे बदलवून घेतले, आणि घास करून तोंडात घेतला. पहिली प्रक्रिया सुरू होते ती लाळेची, ज्याला आयुर्वेदात बोधक कफ असे म्हटलेले आहे. रसनेंद्रियामार्फत त्याचे बोधन होऊन त्या पदार्थाला पचवायला जे जे द्रव्य पुढे आतमधे हवे आहे, त्याचा […]

हिंदू महिने शिकवण्यासाठी एक मस्त गीत

चैत्र नेसतो सतरा साड्या वैशाख ओढतो व-हाडाच्या गाड्या ज्येष्ठ बसतो पेरित शेती आषाढ धरतो छत्री वरती श्रावण लोळे गवतावरती भाद्रपद गातो गणेश महती आश्विन कापतो आडवे भात कार्तिक बसतो दिवाळी खात मार्गशीर्ष घालतो शेकोटीत लाकडे पौषाच्या अंगात उबदार कपडे माघ करतो झाडी गोळा फाल्गुन फिरतो जत्रा सोळा वर्षाचे महिने असतात बारा प्रत्येकाची न्यारीच त-हा।।

इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग चार

आपण खातोय त्या पदार्थाचे ज्ञान इंद्रियांना अगोदर होते. शब्द, स्पर्श, रूप, रस गंध या तन्मात्रा द्वारे, पृथ्वी आप तेज वायु आणि आकाश महाभूतांची आहारातील अनुभूती निर्गुण आत्म्यापर्यंत, चंचल मनामार्फत नेली जाते. आणि जी अनुभूती येते तिला “समाधान” म्हणतात. जेवताना हे समाधान मिळाले पाहिजे. नाहीतर “माझ्या श्योन्याला खाल्लेले अंगालाच लागत नाही” अशा तक्रारी सांगणाऱ्या अनेक माता असतात. […]

शिवपुर्वकाळ

शिवचरित्र जाणून घ्यायचे असेल तर शिवपुर्वकालीन देशस्थिती ज्ञात असणे आवश्यक वाटते. शिवाजीराजांनी इतर साम्राज्यापेक्षा स्वराज्यात जनतेला वेगळं असं काय दिलं? या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी शिवपूर्वकाळाचा आढावा घ्यावा लागतो. शिवपूर्वकालीन हिंदुस्थानावर नजर टाकली तर बहुतांश भागांवर इस्लामचे आधिपत्य झाले होते हे लक्षात येईल. इथले सत्ताधीश स्वतःला इस्लामचे अनुयायी म्हणवत. अशा या सत्ताधीशांविषयी सर्वसामान्य लोकांमध्ये असंतोषाची भावना होती. या यावनी सत्तेचे स्वरूप हे प्रामुख्याने ‘ लष्करी ‘ होते. इथे […]

‘जात’ म्हणजे काय?

जात हा शब्द, संस्कृत जन..जा..म्हणजे जन्म घेणे या क्रियापदापासून आलेला आहे. त्यापासूनच. जन, जनता, जनक, जननी, पूर्वज, वंशज वगैरे शब्द आलेले आहेत. […]

चाईल्ड सायकॉलॉजिस्ट बापानं मुलाला लिहिलेलं पत्र

हॉँगकॉँगच्या एका टीव्ही ब्रॉडकास्टर आणि चाईल्ड सायकॉलॉजिस्ट बापानं वयात येणा-या मुलाला लिहिलेलं पत्र त्याचा हा मराठी अनुवाद. नक्की वाचा आणि पटलं तर आपल्या वयात येणाऱ्या मुलांनाही वाचायला द्या. फक्त एकदा नाही तर पुन्हा पुन्हा वाचा आणि पुन्हा पुन्हा वाचायला सांगा…..पुन्हा पुन्हा एवढ्यासाठी कि ज्यावेळी जसा मूड असेल तसा प्रत्येक वेळी वेगळा अर्थ समजून येईल. “माझ्या लाडक्या […]

1 9 10 11 12 13 35
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..