नवीन लेखन...

इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग दोन

प्रत्यक्ष इंद्रिय पचनाला ताटातच सुरवात होते. आपल्या हातानी, बोटांनी आपण आहार जेवायला सुरवात करतो. म्हणजे त्या अन्नाचा स्पर्श आपण अनुभवतो. एखादा पदार्थ गरम, गार, कोमट, कडक, मऊ, त्याचा घट्टपणा, पातळपणा हे आपण बोटांमार्फत अनुभवतो. सुरी काट्या चमच्याने जेवत हा अनुभव घेता येईल का ? नाही. आणि हातपाय पाण्याने धुवुन जेवायला बसावं हे ओघाने आलंच. आणि नखं […]

१० वर्ष

१० वर्ष आईची.. पुढली १० बाबांची. १० दिली नवऱ्याला.. १० दिली मुलांना.. सर्वार्थाने केवळ त्यांची. आता मात्र मुक्त हो… ही १० स्व:तःची… वाच, नाच, मौज कर… हवे ते ते स्वैर कर. पुढील १० आहेत मग त्याच्या-आपल्या तब्येतीची… त्या पुढील १० वानप्रस्थ… संसारातून निवृतिची. म्हणून म्हणते… हीच १० वर्षे फक्त तुझी नाहीत दुसऱ्या कुणाची सूनेच्या संसारातही नाक […]

भारतात बनलेला पहिला संगीतप्रधान बोलपट

भारतात बनलेला पहिला संगीतप्रधान बोलपट मुंबईच्या मॅजेस्टिक सिनेमामध्ये १४ मार्च १९३१ रोजी प्रदर्शित झाला. इम्पिरियल मूव्हीटोन निर्मित, आर्देशीर इराणी दिग्दर्शित या हिंदी चित्रपटाचं नाव होतं ‘आलम आरा’! चित्रपटांमध्ये ध्वनीचे महत्त्व समजून इतर बोलपट प्रदर्शित होण्यापूर्वी इराणी यांनी आलम आरा प्रदर्शित केला. हा चित्रपट तेव्हा इतका लोकप्रिय झाला की, प्रेक्षकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी अक्षरश: पोलिसांची मदत घेण्यात […]

खेळ आकड्यांच्या

• महाराष्ट्राचा अर्थसंकल्प १८ मार्च रोजी मांडला जाणार आहे. • दरडोई उत्पन्न आणि मानव विकास निर्देशांक यांच्या बाबतीतही महाराष्ट्राचा देशात अनुक्रमे तिसरा आणि सातवा क्रमांक लागतो. • गेल्या पाच वर्षांपासून महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सरासरी १० टक्क्यांनी वाढते आहे. सन २०१६-१७ मध्ये महाराष्ट्राचे सकल राज्य उत्पन्न मागील वर्षांपेक्षा १२ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे, तर सन २०१५-१६ मध्ये हीच […]

प्रभू नामस्मरण

नाम घ्या हो तुम्ही,  प्रभूचे सतत नामस्मरण ,  असू घ्या मुखांत …१ काय सांगावी,  नामाची थोरवी दगडही जेथे, तरंगून जाई…२ रोम रोमामध्यें,  प्रभूचा संसार बनून कवच, रक्षती शरिर…३, नामाची लयता, मन गुंतवून एक होतां चित्त, जाई आनंदून…४ अंतीम ध्येय,  ईश समर्पण नामानी साधती,  प्रभू सर्वजण…५   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com      

कोल्हापूर-दरबारचे सुप्रसिद्ध प्रभावशाली गायक अल्लादिया खाँ

अल्लादिया खाँसाहेबांच्या घराण्याचे मूळ पुरुष नाथ विश्वंभर. त्यांचा जन्म १० ऑगस्ट १८५५ रोजी झाला. मूळचे हे घराणे शांडिल्यगोत्री आद्यगौड ब्राह्मणांचे. पण दिल्लीजवळील अनूप-संस्थानाच्या आपल्या आश्रयदात्या अशा एका हिंदू अधिपतीला दिल्लीपती मुसलमान बादशहाच्या कैदेतून सोडविण्याच्या मोबदल्यात या घराण्यातील एक पूर्वज मुसलमान झाले. खाँसाहेबांचा जन्म जयपूर संस्थानामधील एका छोट्याशा जहागिरीच्या उनियारा या गावी झाला. मा.अल्लादिया खाँ यांचे पाळण्यातील नाव ‘गुलाम एहमद’ […]

आयुष्याच्या निर्मितीचा रंग कोणता? ‘पांडु’रंग, ‘पांडुरंग’..

आयुष्य निर्मितीचा खरा ‘रंग’ ‘काळ्या’तून जन्मलेला ‘पांढरा’ व पुन्हा ‘काळा’ हे मनोमन पटलं, आणि ‘पांडुरंगा’चा अर्थही पटतो..! ‘काळ्या’ विठ्ठलाला अन्यथा ‘पांडूरंग’ असं विजोड नांव का बरं दिलं असावं..!! […]

शिक्षित अडाणी

युनिव्हर्सिटी कॅम्पसच्या बाहेर एक भाजी विक्रेता फुटपाथवर जवळपास पंचवीस प्रकारच्या भाज्या विकायला बसतो. भाजी घेणाऱ्यांची तोबा गर्दी असते, साधारण वाडीकडे जाणारे सर्व लोक यांच्याकडूनच भाजी घेतात, याचे प्रमुख कारण भाजी बाजारभावापेक्षा स्वस्त असते. सर्व दुचाकी व तुरळक चारचाकी पण इथे थांबून भाजी घेऊन पुढे जातात, हा विक्रेता भाजी घेणाऱ्या प्रत्येकाला एका भाजीला एक प्लास्टिक पिशवी देतो, […]

श्रेष्ठ कवी कृष्णाजी केशव दामले म्हणजेच केशवसुत

मराठी कवितेला इंग्रजी काव्यातील आत्मविष्काराचे नवे क्रांतिकारी वळण देणार्याच या कवीने आपल्या कवितांतून स्त्री-पुरुषातील प्रेम, निसर्ग, सामाजिक बंडखोरी व गूढ अनुभूतींचा आविष्कार केला. त्यांचा जन्म १५ मार्च १८६६ रोजी झाला.‘एक तुतारी द्या मज आणून, फुंकीन मी ती स्वप्राणाने’ अशी हाक देऊन पृथ्वीला ‘सुरलोक साम्य’ प्राप्त करून देण्याचे महास्वप्न आपल्या क्रांतदर्शी प्रतिभेने पाहणार्याक कवी केशवसुत. कवी केशवसुत म्हणजे मराठी कवितेच्या […]

ज्येष्ठ संगीतकार भास्कर चंदावरकर

श्वास, सामना, गारंबीचा बापू, सरीवर सरी, एक डाव भुताचा असे गाजलेले चित्रपट आणि ‘घाशीराम कोतवाल’ सारखी अजरामर नाटय़कृती संगीतबद्ध करणारे प्रयोगशील संगीतकार, प्रसिद्ध सतारवादक आणि अध्यापक भास्कर चंदावरकर यांनी रवीशंकर व त्याच्या पत्नी अन्नपुर्णा देवी यांच्याकडून त्यांनी सतारवादनाचं शिक्षण घेतलं. त्यांचा जन्म १६ मार्च १९३६ रोजी झाला.चित्रपट आणि संगीताचा शास्त्रशुद्ध अभ्यास आणि संशोधन करणा-या जगातल्या मोजक्या जाणकारांमध्ये त्यांचं नाव […]

1 11 12 13 14 15 35
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..