बहुरंगी व्यक्तिमत्व कृष्णा कोंडके ऊर्फ दादा कोंडके
‘अपना बाजार’ दुकानात दरमहा साठ रुपयाने कामावर असतानाच दादा कोंडके सेवादलाच्या बँडमध्ये काम करू लागले. त्यांचा जन्म ८ ऑगस्ट १९३२ रोजी झाला. तेथे कलेचा नाद शांत बसू देईना, म्हणून प्रसिद्ध गाण्यांची विडंबने करणे, विचित्र गाणी रचणे, त्यांना चाली लावणे हे फावल्या वेळेतले छंद त्यांनी जोपासले. सेवादलात असतानाच त्यांची गाठ निळू फुले, राम नगरकर यांच्याशी पडली. आणि सेवादलाच्या नाटकांत दादा […]