नवीन लेखन...

आर्थिक वर्ष २०१६-१७ चा अंतिम दिवस

आर्थिक वर्ष २०१६-१७ चा अंतिम दिवस म्हणजे ३१ मार्च. एप्रिल महिन्यांपासून नवे आर्थिक वर्ष सुरू होते.या आर्थिक वर्षाला निरोप देण्याआधी प्राप्तिकराच्या बाबतीत काही आवश्यीक कामे आपण ३१ मार्चआधी न विसरता करून घ्यायला हवीत, प्रचलित प्राप्तिकर कायद्यानुसार करदाता आपले मागील दोन आर्थिक वर्षांचे प्राप्तिकर विवरणपत्र भरू शकतो. याचा सोप्या भाषेत अर्थ असा, की जर आपले आर्थिक वर्ष […]

गोहत्याबंदीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता का दिली?

“गोहत्या बंदी” हा लढा कोण्या हिन्दू साधूचा, rssचा, नाही. ‘स्वदेशी आंदोलन’ हे अत्यंत तर्कशुद्ध यशस्वी आंदोलन देशभर नेणाऱ्या कै.ड़ॉ राजिव दीक्षित यांचा हा यशस्वी न्यायालयीन लढा आहे. […]

स्पर्शतृष्णा

मी कधीही माहेरी गेले की माझी पंच्यांयशी वयाची आई माझ्या अवती भवती घुटमळत असते. आधी माझ्या गालांवरून हात  फिरवून घेते, नंतर माझ्या ओढणीचं टोक तरी चाचपते. मी आपली तिचं कुशल विचारून भाचेकंपनीचे लाड करण्यात, भावावहिनीची चेष्टा मस्करी करण्यात मग्न असते. आई तिथेच कौतुकाने मला न्याहाळत असते. माझ्या नव्या बांगडीला हात लावून बघते. सुरूवातीला मला तिचं या […]

डॉक्टर  नावाच्या देवांनो…….!

एका दु:खी बापाचे काय सांगू गाऱ्हाणे…..! काळाने उलटा डाव टाकला होता हसतं खेळतं बाळ अंथरुणाला खिळलं होतं. एक दिवशी काळ उगवला अन बाबूचा बबन्या देवाघरी गेला. डेंग्यूने एक बळी घेतला होता. बाबु हतबल झाला. तीळ तीळ तुटला. बाबु होता कणखर तरीही वाहत होती डोळ्यातून आसवांची खळखळ…! एखादे फुल उमलण्याच्या आधीच नष्ट झाले. त्या मात्या- पित्यावर झालेला […]

इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग चौदा

पचनासाठी कफ, पित्त वात तीनही दोषांची आवश्यकता असते.या दोषांच्या गुणांचा विचार केला तर कफ आणि पित्त यांना स्वतःची गती नाही, हे दोन्ही दोष स्वतःचे काम करण्यासाठी, हालचाली करण्यासाठी, वातावर अवलंबून असतात. ग्रंथकार एक उत्तम उदाहरण देतात. जसे आकाशातले काळे पांढरे ढग स्वतः काहीच करू शकत नाहीत, जेव्हा वारा येतो, तेव्हाच हे ढग हालचाली करू शकतात. आणि […]

३६० वर्षांची तळमळ…..

सुप्रभात रसिक वाचकहो , सुप्रभात ! अाज फाल्गुन वद्य अामावास्या ! स्वराज्याच्या द्वितीय अभिषिक्त छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिन ! त्याना त्रिवार वंदन करुन एक लेख पाठवतो अाहे…… या अद्वितीय योध्द्यास कोटी कोटी प्रणाम ! उदय गंगाधर सप्रेम-ठाणे. नमस्कार माझ्या देशबांधवांनो आणि भगिनींनो ! आमचा जन्म सुमारे ३६० वर्षांपूर्वी झाला , आणि आमच्या ध्येयाविषयी किंवा आमच्या […]

ठाणे म्यूझिक फोरम

सप्रेम नमस्कार मंडळी ! अापणां सर्वांनाच महाभारतामुळे संजय हे पात्र परिचित अाहे की जो अंध धृतराष्ट्राला कुरुक्षेत्रावर रोज काय चाललंय याचं साद्यंत वर्णन करुन सांगायचा कारण त्याच्याकडे तशी दिव्यदृष्टी होती ! अाज मीही असाच काहिसा रोल करणार अाहे : पण यात दोन प्रमुख फरक अाहेत — १) मी संजयसारखी दिव्यदृष्टी असलेला नाहि अाणि अापण सारे अंध […]

हे राम , नथुराम

काल गडकरीला हे नाटक पाहिलं अाणि खूप दिवसांनी काहितरी विचार मनात घेऊन नाट्यगृहाबाहेर पडलो ! या माझ्या लेखाच्या वाचक मित्र—मैत्रिणिंनो , हे नाटक इतक्या ज्वलंत विषयावरचं अाहे की त्याचा अाशय काय असावा हे वेगळं लिहिण्याची गरज नाहि.या नाटकाचं परिक्षण वगैरे करण्याएवढा मी मोठा लेखक नाहि अाणि तसा माझा कांगावखोर दावाहि नाहि.हा लेख लिहिण्यामागे केवळ दोनंच उद्देश […]

अभिनेते आणि विनोदवीर जगदीप (सूरमा भोपाली )

सैयद इश्तियाक अहमद जाफरी हे जगदीप यांचे खरे नाव. त्यांचा जन्म २९ मार्च १९३९ रोजी मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात झाला. जगदीप अभिनयास सुरुवात बाल कलाकार म्हणुन बी.आर. चोपरा यांच्या अफसाना या चित्रपटाने केली. बाल कलाकार म्हणुन त्यांचे इतर चित्रपट अब दिल्ली दूर नही, मुन्ना व हम पंछी एक डाल के. त्यानतंर बिमल रॉय यांच्या दो बीघा जमीन या […]

२९ मार्च १९३० – ‘प्रभात’चा ’खूनी खंजीर चित्रपट प्रदर्शित

२९ मार्च १९३० रोजी ’प्रभात’चा ’खूनी खंजीर हा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला. कोल्हापूर येथील मंगळवार पेठेतील तस्ते गल्लीजवळच्या इमारतीत प्रभात फिल्म कंपनीची स्थापना १९२९ झाली. व्ही. शांताराम, फत्तेलाल शेख, केशवराव धायबर, सीताराम बी. कुलकर्णी व विष्णुपंत दामले या तत्कालीन चित्रसृष्टीतील धुरीणांनी मोठे ध्येय घेऊन ही कंपनी उभारली. बुद्धिमत्ता, पवित्रता, शालीनता, सौंदर्यता, कलात्मकतेचे बळ घेऊन नवे स्वप्न […]

1 2 3 4 35
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..