नवीन लेखन...

आहारात मनाची एकरूपता हवी

मी गेली २५ वर्षे जेवताना बरेचवेळा मन अन्नाबरोबर एक करून (म्हणजे जेवताना इतर विचार न करणे, फक्त घास चावण्यावर लक्ष केंद्रित करणे) जेवतो मला याचा खूप फायदा झाला व होत आहे. […]

टेनिस कोर्टच्या राण्या – विल्यम्स भगिनी

गुंडांच्या वसाहतीत त्यांचे घर. घराच्या जवळ अतिशय प्राथमिक अवस्थेतील टेनिस कोर्ट आणि त्यावर सराव करणाऱ्या दोन लेकी आणि बाप. अचानक गोळीबार सुरू व्हायचा. या तिघांना लपायलाही जागा नसायची. अनेकदा तिघेही कोर्टवरच लोळण घेऊन आपला बचाव करायचे. गोळीबार, गरिबी, प्राथमिक सुविधांचा अभाव असे सर्व विरोधीच वातावरण आणि त्या सर्वांवर मात करणाऱ्या विल्यम्स भगिनी, त्यांचे वडील रिचर्ड यांनी […]

हिंदी,मराठी चित्रपटसृष्टीतील तरुण पार्श्वगायिका श्रेया घोषाल मुखोपाध्याय

घोषाल कुटुंब फाळणीनंतर पूर्व बंगालमधून पश्चिम बंगालमध्ये स्थलांतरित झालं. हे एक हुशार कुटुंब. श्रेयाचे वडील बिश्वजीत घोषाल मुखोपाध्याय हे भारतीय आण्विक ऊर्जा महामंडळात प्रकल्प अभियंता म्हणून काम करतात आणि आईने साहित्यात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. बंगालमध्ये होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये दोघे उत्साहाने सहभागी व्हायचे. या अशा कार्यक्रमांमध्ये श्रेयाची आई गाणं म्हणायच्या. चार वर्षांची असल्यापासून श्रेयाने आईला पेटीवर […]

चिंतामणराव कोल्हटकर

चिंतामणराव कोल्हटकर यांचे वडील हे वर्तमानपत्र लेखक आणि वक्ते होते. त्यांचा जन्म १२ मार्च १८९१ रोजी नेवरे रत्नागिरी येथे झाला.चिंतामण कोल्हटकरांच्या वयाच्या सातव्या वर्षीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. लहानपणी अभ्यासात अधिक गती नसल्याचे पाहून काही वर्षे त्यांनी पिढीजात असलेली शेती केली. सातारा येथे ‘तुकाराम’ या नाटकात त्यांनी ‘मंबाजी’ची भूमिका साकारून (१९०७) रंगभूमीवर प्रवेश केला. नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर याचं […]

जेवणाची योग्य वेळ कोणती – भाग 17

अष्टांग संग्रहातील मात्राशीतीय नावाच्या अध्यायातील हे श्लोक म्हणजे आयुर्वेदातील भौतिकशास्त्रच नव्हे काय ? विज्ञान विज्ञान म्हणजे दुसरे आणि काय ? उष्णतेमुळे पदार्थाचे प्रसरण होते आणि शीत स्पर्शाने पदार्थ आकुंचित पावतो, हा भौतिकशास्त्रातील नियम या श्लोकात वर्णन केलेला दिसतो. आपली दृष्टीची कक्षा वाढवली की सगळं स्पष्ट समजायला लागतं. सूर्याच्या उष्णतेच्या प्रभावाने स्रोतसांचा विकास होतो. जेवढा पाईप मोठा […]

पुनः एकदा पीसीओडी

मी पीसीओडीच्या मानसिक हेतुंबद्दल लिहायला सुरवात केली आणि छान मंथन झाले. काही स्तुती करणाऱ्या, तर काही अत्यंत कटू जहाल, तर काही अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया मिळाल्या. काहींचा सूर फक्त स्त्री मुक्तीवादी होता, काहींना यात धार्मिक वास आला, तर काही अगदी गंमतीशीर होत्या. म्हणजे हे तुम्ही आम्हालाच का सांगता, पुरूषांना देखील सांगा ना ! इथपर्यंत !! काल मी संप्राप्ती […]

१६०० कोटींच्या कंपनीचा मालक

कसबा पेठेतून न्यू जर्सीपर्यंतची वेगवान आगेकूच. एक भन्नाट यशोगाथा. अथक परिश्रमाने आकाराला आलं एक अफलातून चाकोरीबाहेरचं व्यक्तिमत्त्व. ‘दीपक सखाराम कुलकर्णी.’याव्यतिरिक्त लेखाला वेगळं शीर्षक असण्याचं काहीच कारण नाही. एवढय़ा तीन शब्दांतून यशाचं संपूर्ण डीएसके विश्व डोळय़ांसमोर उभं राहतं. मजला क्रमांक २६. दुर्गामाता टॉवर्स. दक्षिण मुंबई. उजव्या हाताला मुकेश अंबानींचं पेंट हाऊस, हेलिपॅड. डावीकडे ताज, गेट वे सकट […]

कशासाठी – डोक्यासाठी, मेंदूच्या वाढीसाठी

हाडे ठिसूळ होऊ लागली की आपण लगेच कॅल्शियमच्या गोळ्या घेऊ लागतो, कारण हाडांमधील ९०% हिस्सा कॅल्शियमने बनलेला असतो. रक्तातील लोह (हिमोग्लोबिन) कमी झालेले दिसले की लगेच आयर्नच्या गोळ्या घेतो. पण मेंदूचे स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी आपण अशी काहीच काळजी घेत नाही. वास्तविक हाडे किंवा रक्तातील लोहापेक्षा कईक पटीने आपला मेंदू अधिक महत्वाचा आहे. म्हणूनच “सर सलामत, तो पगडी पचास” अशा म्हणी प्रचारात […]

भारवाहन क्षमता

भारताने नुकतेच १०४ सॅटेलाईट एकाच लॉंचरमधून अवकाशात सोडले. जगभरातून त्याचे कौतुक झाले.. एकाच वेळी १०४ !!! जबरदस्त !!! पण जगाला काय माहित की आमच्याकडे कोणत्याही वस्तू वाहून नेण्याची क्षमता म्हणजेच भारवाहन क्षमता (Carrying Capacity) वर्षानुवर्षे फार मोठी आहे….

ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची आवश्यकता

मानव अभिव्यक्तीप्रधान प्राणी आहे. आपले अस्तित्व सिध्द करण्यासाठी त्याची धडपड असते.ते झाले तर जीवनात सफलता येते. जगण्यात जीवंतपणा येतो. आपली संस्कृती जतन करता येते. भावभावना आणि सृजनाचा मुक्त आविष्कार होत असतो. प्रबोधन होते. संस्कार होतात. समाज घडतो. सामाजिक घडामोडींचे प्रतिबिंब साहित्यात उतरत असते. तद्वतच साहित्य जगण्याचे नवे भान देते. वेदना, आक्रोश, प्रेम, शौर्य, विद्रोह, हर्ष यासम […]

1 20 21 22 23 24 35
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..