वियोग
सहवासाचे सुख जेवढे, वियोगाचे दुःखही तेवढे । बांधल्या प्रेम बंधन गाठीं, तुटता विसरुन जाती ।। लपुन बसती दुःख खुणा, समज न येई त्याची कुणा । उडून जातां शाल सुखाची, व्यक्त होई मग दुःखे जीवाची ।। कशास करितो प्रेम असे ते, सहवासाने वाढत जाते । फुग्यापरी जातां फूटूनी, दुःख सारे जीवनीं आणिते ।। दाखव प्रेम त्याच ठिकाणी, […]