भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके
दादासाहेब फाळके यांचे पूर्ण नाव धुंडिराज गोविंद फाळके. त्यांचा जन्म ३० एप्रिल १८७० रोजी झाला. १५ एप्रिल १९११ रोजी ख्रिस्ताचे जीवन हा अर्ध्या तासाचा मूकपट त्यांच्या पाहण्यात आला. त्यातून प्रेरणा घेऊन स्वदेशी चित्रपटव्यवसाय उभारण्याचे त्यांनी ठरविले आणि त्या दृष्टीने त्यांचा चित्रपट निर्मिति विषयक अभ्यास रात्रंदिवस सुरू झाला. डोळ्यांवरील अतिताणाने त्यांना तात्पुरते अंधत्व आले; परंतु सुदैवाने मुंबईचे डॉ. प्रभाकर या […]