नवीन लेखन...

साडेतीन एकरावर ‘पुस्तकाचे गाव’

ब्रिटन मधील हरफोर्डशायर येथे ‘ऑन वे’ या नावाचे गाव असून हे गाव पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाते. त्याच पध्दतीने महाराष्ट्रातही, स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असणारे महाबळेश्वर तालुक्यातील भिलार हे गाव आता ‘पुस्तकाचे गाव’ या रूपाने वाचन संस्कृतीसाठी समृद्ध झाले आहे. देशातील हा पहिला महाराष्ट्र शासनाने राबवला असून या प्रकल्पामुळे महाबळेश्वर तालुक्याचा देशात नावलौकिक उंचावला आहे. या योजनेंतर्गत भिलारमधील […]

दाते पंचाग कर्ते पंडित धुंडिराजशास्त्री ऊर्फ अण्णा लक्ष्मण दाते

भारतीय कालगणना सांगणारी आणि भारताच्या सामाजिक, आर्थिक जडणघडणीचा महत्त्वाचा भाग असलेली परंपरा म्हणजे पंचांगाची परंपरा. पंचांग म्हटले, की पहिले नाव डोळ्यांसमोर येते ते दाते पंचांगाचे. १९०६ मध्ये लोकमान्य टिळकांनी ज्योतिष परिषदेत ‘पंचांग हा आकाशाचा आरसा आहे. पंचांगातील गणित आकाशात दिसले पाहिजे,’ असे वक्तव्य केले होते. त्या काळी पंचांगामध्ये एकवाक्यता नव्हती. मतभिन्नता होती. गणित एकच असताना फरक […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग दहा

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक चार जगण्यासाठी औषध काम करत नाही. काही गोष्टी आपण गृहीत धरतो, जसे एकदा रक्तदाब वाढला म्हणजे तो रोग मला झाला, एकदा कधीतरी रक्तात साखर मिळाली म्हणजे मला डायबेटीस झाला, एकदा रिपोर्ट मधे कोलेस्टेरॉल वाढलेले दिसले, आता जेवणातले तेल तूप नारळ शेंगदाणे बंद करायला हवेत. असंही नाही. काही जणांना मात्र उगाचच औषधे […]

दुःख विसर बुद्धी

कसे मानू उपकार, देवा तुझे देऊन बुद्धि विसर, करी कल्याण माझे खेळ आहे जेथें, हार जीत आहे घर बांधणीते, पड झड पाहे असे जन्ममरण, ह्याच देहीं हेच असतां जीवन, सुख दुःखे पाही एक दुःख येतां, मन होई निराश काळ पुढे जाता, विसरे ते सावकाश एका दुःखाचा चटका, दग्ध करी मनां जमता दुःखे अनेक, नष्ट करील जीवनां […]

संस्कारा प्रमाणे

समान बल ते असतां समोर, टक्कर त्याची होई सबळ दुर्बल याचा संघर्ष,  टळत नेहमी जाई….१, मर्दूमकीचा विचार ठेवूनी,  मैदानी उतरी त्याच स्थरावर सारे घडते,  मुरले जे शरिरी….२, ज्ञानी लढतो ज्ञानी जनाशी, वाद-विवाद करूनी हात घाईची सिमा परि,  तो टाळी विचारांनी…..३, मस्तावले शरिर असतां,  धक्का-बुक्की होते देहामधली जमली शक्ती,  बाह्य मार्ग शोधते….४, दिसून येतो ऊर्जा वापर,  देह […]

सुखाचा डब्बा

जगातील वस्तू, वाटे आकर्षक देह सुख देण्या, समजे त्या ठिक…१ प्रत्येक गोष्टीला,  डब्याचा आकार सुखाचे वेष्ठन, ते चमकदार…२ चमक बेगडी,  फसवी सर्वाला काय डब्यामध्ये,  कळेना कुणाला…३ झाकण उघडा,  दुःख दिसे आंत लपून बसले,  प्रत्येक गोष्टीत…४ हात लावताच,  दुःख हाती येई भासलेले सुख,  नष्ट होत जाई…५ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

उभारी

कोपऱ्यांत तो पडला होता,  शरिर जर्जर होऊन जरी झाला हतबल देह,  सदैव उत्साही त्याचे मन…१, झगडा देवूनी आयुष्याशीं,  जीवनाचे घरकूल बांधले सुख दु:खाच्या विटा चढवूनी,  त्याग श्रमाचे लिंपन केले…२, कर्तृत्वाचे शब्द उमटती,  घरकूलाच्या भिंती मधूनी जगण्यासाठी उभारी देती,  इच्छा शक्तीस जागवूनी…३, गतकाळाच्या आठवणी त्या,  जगण्याचा तो ठेवा बनला सार्थकतेच्या जाणीवेनें,  अंत दशेतील क्लेश विसरला…४ डॉ. भगवान […]

जीवन रंगभूमिवरील यशस्वी कलाकार

वसंता माझा बालमित्र! शाळकरी जीवनांतला. कॉलेज मध्येही एकत्र होतो. दोघेही वैद्यकीय महाविद्यालयांत मिळून शिकलो. आज दोघेही ज्येष्ठ नागरिक म्हणून सत्तरी ओलांडलेले. तो त्याच्या गांवी  मराठवाड्यांत स्थायीक झाला. तर मी शासकिय नोकरीत राहून अनेक गावांचे पाणी चाखू लागलो. मी त्याच्या गांवी अनेक वेळा गेलो होतो. मात्र गेल्या २५ वर्षांत त्याच्याकडे जाणे झाले नाही. त्याच्या आग्रहाने मी त्याच्या […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग नऊ

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे क्रमांक तीन – रोगाचे लेबल लावू नका.” ज्याप्रमाणे एखाद्या एसटी ला पाटी लावली की ती गाडी त्याच मार्गाने फिरेल. त्याच मार्गाने जाताना त्याच सर्व नियमांचे पालन करावेच लागेल. तेच सर्व खड्डे, तेच स्पीड ब्रेकर, तेच अडथळे, तेच वाहतुकीचे नियम, तेच थांबे, तीच वेळ, तशीच गती अपेक्षित ठेवली जाते. कारण आपण गाडीला बोर्ड लावलेला […]

1 10 11 12 13 14 33
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..