दुःख कसे विसरलो
काय केले दुःख विसरण्याला युक्ति जमली नामीं, आनंद आणण्याला ।।धृ।। निराशेच्या काळांत दुःख होते मनांत हार झाली जीवनांत शांत राहण्याचा मार्ग, त्यावर शोधला ।।१।। युक्ति जमली नामीं, आनंद आणण्याला चूक राई एवढे दुःखाचा पर्वत पडे मनीं पश्चाताप घडे भोग भोगण्या, झालो तयार ।।२।। युक्ति जमली नामीं आनंद आणण्याला एकाग्र चित्तांत जातां ध्यानांत डूबता आनंदात विसरुन गेलो […]