MENU
नवीन लेखन...

मराठी भावगीतांचे सम्राट – गजाननराव वाटवे

‘वारा फोफावला’, ‘गगनी उगवला सायंतारा’ आणि ‘यमुनाकाठी ताजमहाल’ या गाण्यांचे गायक गजाननराव वाटवे यांच्या लोकप्रियतेची कल्पना आज एकविसाव्या शतकात करता येणं अशक्य. गजाननराव वाटवे यांचा जन्म ८ जून १९१७ रोजी झाला. मराठीत भावगीताचा जन्म गजानन वाटवेंच्या काव्यगायनाने झाला, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. गजाननराव वाटवे यांनी मराठीतील अनेक कवितांना सुंदर चाली लावून प्रथम भावगीताचा प्रकार लोकांपर्यंत नेला. आणि त्यांच्या या […]

ग्वाल्हेर घराण्याचे गायक नारायणराव व्यास

नारायणराव व्यास हे पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य होते. त्यांचा जन्म ४ एप्रिल १९०२ रोजी कोल्हापूर येथे झाला. ते ख्याल, भजन व ठुमरी गायनासाठी ते विशेष प्रसिद्ध होते. मा. नारायणराव व्यास यांचा जन्म संगीत उपासकांच्या कुटुंबात झाला. त्यांचे वडील, काका हे कोल्हापुरात संगीत क्षेत्रात नाव कमावून होते. विख्यात संगीतकार व गायक शंकरराव व्यास हे नारायणरावांचे वडील बंधू होत. […]

बदलते भाव

कसा वागतो दोन प्रकारे,  दिसून सर्वा येते राग दाखवी क्षणात,  आणि प्रेमळ ही वाटते….१ देहस्तरावरले प्रश्न सारे,  सुख-दु:खानी भरले अंतर्मनातील भाव परि,  आनंदीच वाटले….२ देहाशी त्या येवून संबंध,  राग लोभ दाखवी केवळ त्यातील आनंद शोषण्या,  अंतरात्मा शिकवी…३ जड होता पारडे एकाचे,  भाव येई दिसून भावांचे  रंग बदलती,  अंतर बाह्यावरून…४ डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

गायक अभिनेते प्रकाश घांग्रेकर

प्रकाश घांग्रेकर मराठी संगीत रंगभूमीवरील गायकनट होते. प्रकाश घांग्रेकर मुळचे पुण्याचे.संगीत नाटकाची कारकीर्द घडवण्यासाठी १९६० साली मुंबईला आले.धारदार आवाज,देखणे व्यक्तिमत्व पल्लेदार ताना घेण्याची कसब या मुळे त्यांच्या भूमीका प्रभावी होत.देवियाच्या द्वारी या नाटकातून त्यांची कारकीर्दची सुरवात झाली. मानिनी त्यांनी संगीत सौभद्र, सुवर्णतुला, मदनाची मंजिरी, गोरा कुंभार, कट्यार काळजात घुसली या नाटकांत भूमिका केल्या. मानिनी सोडतुझा अभिमान, […]

जीवन म्हणती याला

त्याची ऐकूनी करूण कहाणी,  डोळे भरून आले पाणी हृदय येता उंचबळूनी,  निराश झाले मन  ।।१।। आघात होता त्याच्या जीवनी,  तो तर नव्हता माझा कुणी तरी का आले प्रेम दाटूनी,  उमजेना काही ।।२।। दु:ख दुजाचे समोर आले,  मनास ज्याने कंपीत केले दोन जीवांच्या हृदयामधले,  अदृष्य हे धागे ।।३।। मानव धर्म एक बिजाचा,  वाढत गेला गुंता त्याचा ओढत […]

मराठी विनोदी लेखक व कथाकथनकार द.मा.मिरासदार

मराठीतले विनोदी लेखक व कथाकथनकार दत्ताराम मारुती मिरासदार उर्फ द. मा. मिरासदार यांचा जन्म १४ एप्रिल १९२७ रोजी झाला. काही वर्षे पत्रकारी केल्यानंतर त्यांनी १९५२ साली अध्यापनक्षेत्रात प्रवेश केला. पुण्याच्या कँप एज्युकेशनच्या शाळेत ते शिक्षक होते. व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील आणि द. मा. मिरासदार या त्रयीने १९६२ सालापासून कथाकथन करून महाराष्ट्रातलील जनतेला भुरळ घातली होती. मिरासदारांच्या […]

‘भाडेकरूंचे भले होईल’

मोडकळीस आलेल्या व धोकादायक ठरविण्यात आलेल्या भाडेकरूयुक्त तसेच मूळचे ठाणेकर राहत असलेल्या अनेक इमारती जमीनदोस्त करून आता जवळपास दीड ते दोन वर्षे होत आली. काही इमारतींबाबत तर सहा ते आठ वर्षे होत आली. नव्या गृहनिर्माण धोरणात म्हाडा इमारतीसाठी जास्तीचे चटई क्षेत्र मंजूर करण्यात आले आहे. दाटीवाटीच्या क्षेत्रासाठीही क्लस्टर योजनेखाली अतिरिक्त चटई क्षेत्र मंजूर करण्यात आले आहे. […]

1 15 16 17 18 19 33
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..