नवीन लेखन...

ज्ञान साठा

जमीन खोदतां पाणी लागते, हीच किमया निसर्गाची, कमी अधिक त्या खोलवरती, साठवण असे जलाशयाची ।।१।। प्रत्येक जणाला ज्ञान देवूनी, समानता तो दाखवितो, अज्ञानाचा थर सांचवूनी, आम्ही आमचे ज्ञान विसरतो ।।२।। एक किरण तो पूरे जाहला, अंधकार तो नष्ट करण्या, ज्ञान किरण तो चमकूनी जातां, फुलून येते ज्ञान वाहण्या…..||३|| डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

ज्येष्ठ कलाकार बलराज साहनी

ज्येष्ठ कलाकार बलराज सहानी हे एक श्रेष्ठ चित्रपट अभिनेते म्हणून लोकांना माहित आहेत. पण ते एक थोर तत्त्वचिंतक, समाजसेवक होते ही गोष्ट पहात थोड्यांना ज्ञात आहे. बलराज साहनी डाव्या विचारसरणीचे व्यक्ती होते. ते इंडियन पीपुल्स थिएटरशी जोडलेले होते. बलराज साहनी यांचा जन्म १ मे १९१३ रोजी झाला. बलराज साहनी यांनी लाहोरच्या सरकारी कॉलेजमध्ये प्रोफेसर सोढी आणि प्रोफेसर बुखारी यांच्या मार्गदर्शनात शेक्सपिअर […]

बॉलिवूडमधील चित्रपट निर्माते चंदुलाल शहा

बॉलिवूडमधील चित्रपट निर्माते चंदुलाल शहा यांचा जन्म १३ एप्रिल १८९८ रोजी जामनगर येथे झाला. चंदुलाल शहा यांचे शिक्षण मुंबईत झाले. १९२४ साली ते स्टॉक एक्सेज मध्ये नोकरी करू लागले.  नोकरी करत असताना आपले बंधू मा.जे. डी. शहा जे पौराणिक चित्रपट लेखक होते त्यांना मदत करू लागले. व “लक्ष्मी फिल्म कंपनी” या नावाने कंपनी स्थापन केली व १९२५ साली विमला […]

ईश्वरी इच्छेनेच

वळून बघतां गतकाळाला, चकीत झाले मन  । घटना घडल्या जीवनामध्यें,  राही त्यांची आठवण  ।। चालत असतां पाऊल वाट,  जीवन रेषे वरची  । स्वप्न रंगवी मनांत तेंव्हा,  भावी आयुष्याची  ।। परिस्थितीच्या भोवऱ्यामध्यें,  पुरता गुरफटलो  । फिरणाऱ्या त्या  वर्तुळातूनी,  बाहेर येवूं न शकलो  ।। कल्पिले होते नियतीनें,  तेच घडविले तिनें  । भंग पावले स्वप्नचि सारे,  तिच्याच लहरीनें  ।। […]

रिक्त प्रेमाचा घट

रिक्त प्रेमाचा घट रिक्त झालीस तू ,  लुटवूनी प्रेमाचा घट  // भावंडाचे संगोपन रमवूनी त्यांचे मन आईच्या  कामी मदत देऊन आनंदिले बालपणी, गीत गावूनी नीट  //१// रिक्त झालीस तू , लुटवूनी प्रेमाचा घट लक्ष्य संसारी प्रेम पतीवरी मुलांची जोपासना करी संसार सुखाचे प्याले, भरी काठोकांठ //२// रिक्त झालीस तू ,  लुटवूनी प्रेमाचा घट होता मुले मोठी संसार त्यांचा थाटी राहुनी त्यांचे पाठी सुखासाठी त्यांच्या,  करी देहकष्ट   //३// रिक्त झालीस तू ,  लुटवूनी प्रेमाचा घट ईच्छा उरली नसे मनी […]

प्रतिभावंत गायक कुमार गंधर्व

कुमार गंधर्व यांचा बेळगावजवळच्या सुळेभावी खेड्यात कानडी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचा जन्म ८ एप्रिल १९२४ रोजी झाला. त्यांचे मूळ नाव शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकली. लहान वयातच त्यांनी आपल्या गायकीची चमक दाखवली. आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीने त्यांनी रसिकांवर अक्षरशः गारुड केले. घराणेशाहीच्या चौकटीत बंदिस्त व्हायला त्यांनी साफ नकार दिला. त्याऐवजी आपली स्वतःची गानशैली जनमानसात रुढ केली. १९३० आणि १९४० च्या दशकात पंडित […]

मन कि बात- डिप्रेशनवर मात

आयुमित्र दिनांकट ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. दर वर्षी आजाराची थीम ही वेगवेगळी असते. जो आजार मानवी आरोग्यावर जागतिक स्तरावर सगळ्यात जास्त परिणाम फ्करत असेल. हानी पोचवत असेल असा आजार निवडून त्याविषयीची थीम ठेवून जागृती केली जाते. ह्यावर्षी डिप्रेशन-लेट्स टॉक” ही थीम आहे. मेंटल हेल्थ बिलवर जेव्हा लोकसभेत चर्चा चालू होती तेव्हा शशी थरूर […]

थोर साहित्यिक पुरुषोत्तम भास्कर भावे

पु. भा. यांचे नाव मराठी नवकथेचे जनक म्हणून घेतले जाते. कथालेखक म्हणून ते युगप्रवर्तक ठरले. त्यांचा जन्म १२ एप्रिल १९१० रोजी झाला.त्यांच्या सतरा कादंबर्यानी मराठी भाषेत नवतारुण्य आणले. नाटककार म्हणून ते मखमली पडद्यावर आले. नंतर रजपटावर झळकले. आपल्या सर्व साहित्यात त्यानी जीवन व मृत्यु या सनातन प्रश्नांचा पाठपुरावा केला. प्रतिभा, पांडित्य आणि पौरुष यांचा सुरेख संगम भाव्यांच्या लेखनात आढळतो. […]

1 17 18 19 20 21 33
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..