नवीन लेखन...

सुखाची मोहमाया

तप्त लोखंडात,  लपली ती आग दिसे लाल लाल,  जाळी सर्व भाग…१, सुंदर फूलात,  सुंगध तो छान अवती भवती काटे,  ते कठीण…२, विजेची ती तार,  प्रकाशी दिव्याला, झटका तो देई,  स्पर्श होता तिला..३, सुखाच्या पाठीशीं, असे दुःख छाया न दिसे ती आम्हा,  असे मोह माया…४ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

सुखाचा डब्बा

जगातील वस्तू, वाटे आकर्षक देह सुख देण्या, समजे त्या ठिक…१ प्रत्येक गोष्टीला,  डब्याचा आकार सुखाचे वेष्ठन, ते चमकदार…२ चमक बेगडी,  फसवी सर्वाला काय डब्यामध्ये,  कळेना कुणाला…३ झाकण उघडा,  दुःख दिसे आंत लपून बसले,  प्रत्येक गोष्टीत…४ हात लावताच,  दुःख हाती येई भासलेले सुख,  नष्ट होत जाई…५ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

जागतिक आरोग्य दिनानिमित्त…

डिप्रेशन ही सध्या झपाट्याने वाढणारी जागतिक समस्या झाली आहे. खरंतर आम्हा भारतीयांच्या मनाला नैराश्याने स्पर्शही करायला नको. नैराश्यावर दोन रामबाण उपाय आपल्याकडे आहेत. […]

इंद्रियें सेवकासम

खिडकीमधूनी टिपत होतो बाह्य जगाचे द्दष्य आगळे लोभसवाणें चित्र बघण्या आतूर होऊन गेले डोळे नयन नव्हते बघत ते बघत होतो मीच खरा खिडकीसम नयनातूनी द्दष्य उमटते आंत जरा संगीताचे सूर निनादूनी लहरी त्यांच्या उठताती कर्णा मधल्या पडद्यायोगे आनंद मजला देवून जाती मालक असूनी मी देहाचा इंद्रिये सारी असती सेवक ती केवळ साधने असूनी आंतील ‘मीच’ असे […]

विश्वबंधुत्व जपणारी लेखिका पर्ल बक

ज्या साहित्यिकांनी आपल्या लेखनाद्वारे पूर्व-पश्चिम जोडण्याचे म्हणजेच विश्वबंधुत्व जपण्याचे कार्य केले. त्यामध्ये अमेरिकेची प्रसिद्ध लेखिका पर्ल बक (Pearl Buck) हिचे नाव अग्रभागी आहे. पर्ल बक अमेरिकेत जन्मली, चीनमध्ये वाढली व आयुष्याच्या अखेरीस ती पुन्हा अमेरिकेत येऊन राहिली. पर्ल बकचा जन्म २६ जून १८९२ रोजी अमेरिकेतील हिल्स बार येथे झाला. बालपणी तिचे नाव होते पर्ल सिंडेस्ट्रायकर. तिचे आई-वडील […]

हिंदी चित्रपटसृष्टीचे जंपिंग जॅक जितेंद्र

जितेंद्र हे बॉलीवुडचे केवळ एक लोकप्रिय नायक अथवा अभिनेते नाहीत तर त्याचबरोबर अनेक दूरदर्शन मालिका आणि चित्रपट यांचे ते निर्माते आहेत. बालाजी टेलेफिल्म्स, बालाजी मोशन पिक्चर्स या उद्योगांचे ते अध्यक्ष आहेत. […]

तुमच्या मुलाला बोलण्याविषयी समस्या आहे का?

तुमच्या मुलाला बोलण्याविषयी समस्या आहे का?…..हा घ्या उपाय!! तोतरेपणा, बोबडं बोलणं, जीभ जड असणे अशा विविध समस्या कित्येक लहान मुलांना भेडसावत असतात. कित्येकांना तर ‘स्पीच थेरपी’चा उपयोग करूनही काही फायदा होत नाही. सारे उपाय थकल्यावर अशा मुलांचे पालक ‘अखेरची आशा’ म्हणून आयुर्वेदाकडे वळतात. आयुर्वेदात ‘वाक्शुद्धिकर’ म्हणजे वाणी शुद्ध करणारी काही औषधे सांगितली आहेत. त्यांचा वापर केल्यास […]

उधळण

परमेश्वरला निर्गुण निराकार, सर्वशक्तीमान, जगाचा रचैता, सर्व व्यापी, अनंत,एक सत्य, एक आनंद इत्यादी गुणानी वर्णन करीत त्याचे महात्म गायले जातात. जे चांगल दिसल, वाटल, भावल, समजल, अनुभवल, ते सर्व गुणधर्म एकत्रीतपणे त्या परमेश्वराचेच असल्याचे सांगीतले गेले. जे वाईट गुणधर्म जाणवले,ते देखील त्या परमेश्वरांतच असल्याचे म्हटले. म्हणून तो एक परिपूर्ण शक्तीस्वरुप असल्याचे व्यक्त झाले. अनेक विचार अनेक […]

कुठलंही काम, तुमच्या जीवापेक्षा मोठं नाही

तुमच्या आयुष्यासाठी नोकऱ्या, आहेत, त्यांच्यासाठी तुमचं आयुष्य नाही. कृपा करून जमेल व झेपेल एवढंच काम हातात घ्या; त्यासाठी आग्रह धरा. प्रतिष्ठा, पोस्ट, वाढत्या पगाराच्या नादाने किंवा वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याच्या हव्यासाने न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊ नका. खर्च आटोपशीर ठेवा. तुमच्या जीवापेक्षा मौल्यवान काहीही नाही, याचं भान ठेवा. कुटुंबाला वेळ द्या. घरच्या तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम कामावर […]

1 24 25 26 27 28 33
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..