नवीन लेखन...

आजचा विषय – ताडगोळा

उन्हाळा कडक जाणवू लागला आहे पारा दिवसागणिक वाढू लागला आहे. कडकडीत उन्हामुळे लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्व जण तहानेने व्याकुळलेले असताना तहान भागवण्यासाठी बहुतेकांची पावले सहजपणे शीतपेयांच्या दुकानांकडे वळू लागत आहेत. याशिवाय नारळपाणी, कलिंगड इत्यादी तहान भागवण्यासाठी पारंपरिक उपायही योजले जात आहेत. या उष्म्यामध्ये तहान भागवण्यासाठी तसेच शरीराला थंडावा देण्यासाठी ताडगोळे खरेदी करण्यालाही अधिक पसंती आहे. कोकणातून येणारे […]

सुर्य नमस्कार का घालायचे?

आपल्याला शाळेत  आठवी, नववी मधे शरीर शास्त्रात शिकवलेआहे की–आपल्या पोटात जठर, यकृत म्हणजे मराठीत लिव्हर,प्लीहा,स्वादु पिंड,लहान आंतडे, मोठे आंतडे मुत्र पिंड वगेर अवयव आहेत. ह्यातील लहान आतड्याची लांबी 22 फूट आहे. आता विचार करा. देवाने,निसर्गाने एवढ्याशा  जागेत एवढे अवयव व 22 फूटाचे आतडे कसे बसविले असेल? 22 फूटाची कमीत कमी व्यासाची एवढ्या लहान जागेत कशी राहते […]

उतारवयांत जगतांना!

वृद्धापकाळ जीवनामधला अंतीम टप्पा. जणू जीवनाची संध्याकाळ. एका चक्रमय जीवनाचा शेवट होण्याचा पूर्वकाळ. समिश्र अशा भावनांचा उहापोह करण्याची वेळ. न जाणो एक विचार मनांत येतो की ह्या वयाकडे आदर भावाने बघण्या ऐवजी, गमतीदारपणाची हास्यास्पद वाटणारे वय, एक संभ्रमी अवस्था, समजली जाते. ज्याला थोडासे कुत्सीतपणाने बघीतले जाते.  कदाचित् वाढत्या वयानुसार एका स्थरानंतर निर्माण होणारा शारिरीक विकलांगपणा, विसराळूपणा, […]

भक्तीचा महिमा

भक्ती मग ती कोणावरही असो अगदी मनापासून केली की ‘अर्पण’ करण्याची वृत्ती दिवसेंदिवस वाढतच जाते. अशा अर्पण केलेल्या भक्तीचा महिमा अगाध असतो. या संदर्भात आचार्य विनोबा भावे यांना त्यांच्या लहानपणी त्यांच्या आईने सांगितलेली गमतीदार गोष्ट पुढीलप्रमाणे आहे… एका गावात एक स्त्री राहात होती. गावात श्रीकृष्णाचे मंदिर होते. त्या मंदिरातील कृष्णाच्या मूर्तीवर या स्त्रीची अपार भक्ती होती. […]

गीतरामायणाचे रामायण !

गीत रामायण हा एकाच कवीने वर्षभर रचलेला, एकाच संगीतकाराने संगीतबद्ध केलेला, वर्षभर अखंडितपणे चाललेला आकाशवाणीच्या इतिहासातील एकमेव, अभूतपूर्व असा संगीत कार्यक्रम ठरला १ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ पर्यंत तो पुणे आकाशवाणीने प्रसारित केला. साधारण १९५३ साली पुणे आकाशवाणी हे केद्र सुरु झाले. […]

सासरी जाणाऱ्या मुलीस

थांबव गंगा यमुना मुली   आपल्या नयनातल्या हंसण्यात जन्म घातला    मग ह्या कोठूनी आल्या || हांसत गेले जीवन तुझे     फूलपाखरा परी तसेच जाईल भविष्यातें   आशिर्वाद देतो शिरीं || समजतील दुःखी तुजला , नसता तो तुझा स्वभाव हासून खेळून आनंदाने , फूलवित रहा भाव || जाणून घे स्वभाव सर्वांचे , रमुन जा संसारी चाली रितीचे पालन करावे, तुझ्याच […]

एका जिद्दीचा प्रवास

स्त्रियांना वर्ज्य असणार्‍या क्षेत्रातच एखादी स्त्री पाय रोवून उभी असेल तर नवल वाटेल ना! आज प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. त्याचप्रमाणे मर्चंट नेवीसारख्या कठीण समजल्या जाणार्‍या क्षेत्रात तरी महिला मागे कशा राहतील? या क्षेत्रात कामगिरी केलेल्या रेश्मा मुरकर या तरुणीचा हा जिद्दीचा प्रवास आपण अनुभवूया. एकतर आकाशात उडायचं किंवा पाण्यातून प्रवास करायचा अशी रेश्माची स्वप्नं होती. या […]

उर्दू शायर जिगर मुरादाबादी

जिगर मुरादाबादी यांना उर्दू शायरी चे या विसाव्या शतकातील महान शायर म्हणून मानले जाते. त्यांचा जन्म ६ एप्रिल १८९० रोजी मुरादाबाद येथे झाला. जिगर मुरादाबादी यांचे खरे नाव अली सिकन्दर. लखनौला जिगर मुरादाबादी कसेबसे मॅट्रिक उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे शिक्षण पूर्णही करू न शकणारे मा.जिगर मुरादाबादी यांना अलिगढ विद्यापीठाने पुढे डी.लिट. पदवी दिली. जी पूर्वी फक्त सर इक्बाल आणि सरोजिनी […]

बंगाली अभिनेत्री सुचित्रा सेन

सुचित्रा सेन यांचे विवाहाआधीचे नाव रमा दासगुप्ता असे होते. त्यांचा जन्म ६ एप्रिल १९३१ रोजी झाला. किमान तीन दशके तरी आपल्या सौंदर्याबरोबरच, सशक्त अभिनयाने सुचित्रा सेन या बंगाली चित्रपटाच्या सुवर्णयुगातील एक महत्त्वाच्या साक्षीदार ठरल्या. अग्निपरीक्षा, देवदास, सात पाके बंधा हे त्यांचे बंगाली चित्रपट विशेष लक्षात राहिले. हरणासारखे नेत्रसौंदर्य (मृगनयनी) लाभलेल्या सुचित्रा सेन यांनी सत्तरच्या दशकात चित्रपटसृष्टी सोडली. नेहमी सार्वजनिक जीवनात […]

1 27 28 29 30 31 33
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..