नवीन लेखन...

स्वागत…. नववर्षाचं

अख्ख्या जगात हजारो कालगणन पध्दती आहेत, त्यांच्या दिनदर्शिका आहेत, त्यांचे अनुयायी वर्षानुवर्षे नववर्ष दिवस नियमितपणे साजरे करीत आहेत आणि अेकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देअून, नवीन किंवा ठेवणीतले पोशाख घालून मेजवान्या झोडीत आहेत. […]

१ एप्रिल – ‘एप्रिल फूल’

एप्रिल महिन्याचा पहिला दिवस. ह्या दिवशी गमतीने एखाद्यास बनविण्याची प्रथा पाश्चिमात्य राष्ट्रांत प्रामुख्याने दिसून येते. बनलेल्या व्यक्तीस ‘एप्रिल फूल’ म्हणण्याचा प्रघात आहे. […]

परतवारी – एका वेगळ्या विषयावरील पुस्तक

आजवर कुणी या विषयावर कधी पुस्तक लिहिण्याचा विचारच केला नसेल असा हा विषय म्हणजे ( पंढरपूरपासून ) उलट परतीची वारी ! आषाढी एकादशीला महाराष्ट्रमाऊली विठाईच्या दर्शनाला लाखो भाविक पिढ्यानपिढ्या करीत असलेली वारी, हा एक जागतिक कुतूहलाचा विषय झाला आहे. त्यामुळे यावर आजपर्यंत आणि दरवर्षी विविध लेख, विशेषांक , चित्र सफरीच्या शॉर्टफिल्म्स, कथा, पुस्तके , वृत्तवाहिन्यांचे दैनंदिन […]

क्रांतिकारी संशोधिका मारिया ज्योपर्ट मायर

विद्वत्तेचा वारसा तिला लहानपणापासूनच मिळाला होता. फ्रेडरिक विज्ञानाचे प्राध्यापक तर आई मारिया चूल ज्योपर्ट शिक्षिका होती. वडिलांना विज्ञानाची फार आवड होती. त्यामुळे निसर्गातील अनेक विज्ञानवादी चमत्कार तिला लहानपणीच पहायला मिळाले. त्यामुळे तिचीही विज्ञानदृष्टी तयार झाली व पुढे ‘ वैज्ञानिक संशोधन’ हेच तिने आपले ध्येय मानले व परमाणू संरचनेबाबत नवा शोध लावून तिने विज्ञानाला नवी दिशा दिली. […]

पायव्याचे दगड

भल्या पहाटे फोन खणखणला. बोलणारी व्यक्ती स्त्री होती. बोलतांना तिला भावना आवरणं कठीण जात होतं. बराच वेळ केवळ हुंदके ऐकायला आले. त्यानंतर मोठ्या प्रयासाने अगदी काही शब्दच बोलून तिने भेटण्याची वेळ ठरवली. ठरलेल्या वेळेच्या पाच मिनिटं आधीच येऊन ती खुर्चीवर स्थानापन्न झाली. मार्गदर्शनासाठी येणा-या व्यक्तीसाठी आपली समस्या सांगण्यास कुठून व कशी सुरुवात करावी हे एक अवघड […]

अहंकाराची फळे

विजयच्या आत्महत्येची बातमी माझ्यासाठी धक्कादायक होती. एका उमद्या व्यक्तिमत्त्वाने अचानक सर्वांचा निरोप घ्यावा याला काय म्हणावं? स्वत:चं आयुष्य स्वत:च्याच हाताने संपवण्याइतकं असं कोणतं कारण असावं याबद्दल मला जिज्ञासा वाटू लागली. विजयच्या मृत्यूचं दु:ख काही प्रमाणात ओसरल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांकडून त्याच्या आत्महत्येशी संबंधित माहिती मिळविण्याचा मी प्रयत्न केला. विजयचे वडील एक मोठे सरकारी अधिकारी. मोठ्या पदामुळे त्यांच्याभोवती सतत […]

१ एप्रिल २००४ – जीमेलचा वाढदिवस

१ एप्रिल २००४ मध्ये पहिल्यांदा “गुगल‘ने जेव्हा ई-मेलच्या क्षेत्रात नवे पाऊल टाकत असल्याचे जाहीर केले, तेव्हा हा “एप्रिल फूल‘चा प्रकार तर नाहीना, अशी शंकाही अनेकांच्या मनाला चाटून गेली. पण, तसे काही नव्हते. जीमेल ही सेवा त्या वेळच्या इतरांपेक्षा निराळी होतीच, शिवाय गुगलचे भक्कम पाठबळ तिच्यामागे असल्यामुळे नवनवीन तंत्रे अवलंबून वापरकर्त्यांला सुखी ठेवण्याची काळजीही घेतली जाणार, एवढी […]

इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग सतरा

“गॅसवर तुमच्याकडे काही परमनंट औषध आहे काहो ? ” 90% पेशंटचा 100 % विचारला जाणारा एकमेव भाबडा प्रश्न. ज्यावर डाॅक्टरांची विकेटच पडते. आता या प्रश्नाचे उत्तर एका ओळीत, एका शब्दात, आणि एखाद्या औषधांनी, कसं काय देता येणार ? अख्खं वर्ष हेच समजावून सांगण्यात गेलंय, की रोग झाल्यावर उपचार करण्यापेक्षा होऊ नये यासाठी सावधानता बाळगणे, केव्हाही चांगलेच […]

1 31 32 33
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..