नवीन लेखन...

हिंदुस्थानी संगीतातील ‘किराणा’ घराण्याचे गायक माधव गुडी

हिंदुस्थानी संगीतातील ‘किराणा’ घराण्याचे गायक आणि पंडित भीमसेन जोशी यांचे पहिले शिष्य म्हणून माधव गुडी यांची ओळख होती. त्यांनी अनेक वर्षे हिंदुस्थानी संगीताची सेवा केली. त्यांना संगीत नृत्य अॅकॅडमीच्या पुरस्कारासह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. ते ख्यातनाम संगीतकार म्हणूनही ते ओळखले जात. भारतात व परदेशातही त्यांचे अनेक कार्यक्रम झाले होते. विविध आंतरराष्ट्रीय […]

किराणा घराण्याचे शास्त्रीय गायक उपेन्द्र भट

पं.उपेंद्र भट यांनी संगीत विषयात एम.ए. केले असून अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय (मुंबई) तर्फे त्यांना `संगीत विशारद’ आणि `संगीत अलंकार’ पदवी देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांचा जन्म २१ एप्रिल १९५० रोजी मंगळूर येथे झाला. उपेन्द्र भट यांनी मंगलोर च्या श्री नारायण पै यांच्याकडे संगीताची तालमीला सुरुवात केली. नंतर माधव गुढी व पंडित भीमसेन जोशी यांच्याकडे शिक्षण घेतले. पं.उपेंद्र भट […]

अवमूल्यन

उत्साहाने करित होता,  सारे कांहीं इतरांसाठी क्षीण होवूनी जाता शरीर,  आधार तयाला झाली काठी…१, धनाचा तो प्रवाह वाहतां,  गंगाजळीचे पाणी पाजले दुजाकरिता त्याग करूनी,  समाधानी ते इतरा केले….२, धन संपत्तीचे झरे आटतां,  प्रेमळपणाचे शब्द राहीले कालक्रमणाच्या ओघामधल्या,  दुर्बलतेस कुणी न जाणले…३, अपेक्षा ती सदैव असते,  मिळत रहावा सहयोग अवमूल्यन ते केले जाते,  दुर्लक्ष करूनी दुर्बल अंग…४ […]

दररोज कांदा खाल्ल्याचे फायदे

भारतीय आहार पद्धतीमध्ये महत्त्वाचा घटक म्हणजे कांदा. कांदा जेवणाला स्वादिष्ट करण्याबरोबरच यात उत्तम औषधी गुणधर्म आढळतात. म्हणून अनेक आजारांवर कांदा रामबाण उपाय ठरतो. एक नजर टाकुयात कांदा खाण्याच्या फायद्यावर… कांदा हा थंड असल्याने जर तुमच्या हातावर जळहळ होत असेल तर त्या जागेवर कांदा लावा. जर तुम्हाला मुतखड्याचा त्रास असेल तर दररोज सकाळी दोन चमचे कांद्याचा रस […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग तेरा

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे क्रमांक चार जगण्यासाठी औषधं काम करत नाही – भाग चार काही वेळा चिकित्सा पत्रके पाहून असे वाटते की, रोग परवडला पण औषधे आवर. एका औषधाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी दुसरे, तिसरे… चौदा चौदा औषधे दिवसभरात. एखादा रूग्ण सकाळ दुपार रात्रीच्या फेऱ्यात कमीत कमी वीस वेळा तरी औषधं घेत असेल ! परत एवढ्या वेळा पाणी प्यायचे. […]

आत्मा हाच ईश्वर

आत्म्याला ओढ असते     ईश्वराच्या मिलनाची जाण सदैव राहते     प्रभुमय स्वरुपाची   ।।१।। अंशात्मक भाग असे    आत्मा हा परमात्म्याचा उत्कंठ ते  आकर्षण     गुणस्वभाव तो त्याचा   ।।२।। आत्म्यास पडले असे    बंधन ते शरीराचे जीवन कार्ये करुनी    प्रयत्न करी मुक्तीचे   ।।३।। मुक्त होई त्या क्षणीं    अनंतात समावतो परमेश्वरि रुपांत    विलीन होऊन जातो   ।।४।। आत्मा मुक्त होत असे     देहकर्म फळावर […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग बारा

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे क्रमांक चार जगण्यासाठी औषध काम करत नाही – भाग तीन स्वतः ठरवून स्वतःच उपचार करणे हा आणखीन एक अति घातक प्रकार. कोणीतरी सांगितले म्हणून कुठेही, कोणत्याही नागरमुन्नळी सारख्या गावात सुद्धा स्पेशल गाड्या करून औषधे घेण्यासाठी लोक धावतात, याचे आश्चर्य वाटते. आपण आपल्या गाडीची काळजी घेतो, त्यात योग्य कंपनीचे, ऑईल, पेट्रोल, डिझेल घालतो. काही वेळा […]

खांदेरीच्या पोटात दडली विजयगाथा

पोर्तुगीझांबरोबर स्वराज्यास त्रास देणारे जंजिरेकर सिद्दी आणि इंग्रज यांना शह देण्यासाठी, इंग्रजांची सिद्दीला मिळणारी रसद ठप्प करण्यासाठी, या दोन शत्रूच्या मुळावर पाचर ठोकण्यासाठी अलिबाग आणि मुंबईच्या मध्यावरील बेटांवर छत्रपती शिवरायांनी बांधलेला किल्ला…. खांदेरी. खांदेरी म्हणजे इंग्रजी भाषेत हेनरी. यानंतर सिद्दीने दीड किलोमीटर असलेल्या बेटावर उंदेरी किल्ला बांधला. अलिबागसमोरील खोल समुद्रात हे जलदुर्ग आहेत. मुंबई समुद्र किनाऱ्यावरून दिसणारे […]

धन्य तो पिता

एक जेमतेम शिकलेला पिता. नांव त्याचं शिवशंकर कोळी. सोलापूर शहरात राहत होते. त्यांना शिवपार्थ नावाचा लहान मुलगा माध्यमिक शाळेत शिकत होता. चुणचुणीत आणि तल्लख बुद्धीचा.खेळाची आवड होती. त्यात तो फुटबॉल खेळण्यात अत्यंत निष्णात. गेल्या काही दिवसापूर्वी शिवपार्थ मैदानात फुटबॉल खेळत होता. रखरखतं ऊन होत. सूर्य आग ओकत होता. खेळता खेळता शिवपार्थ उष्माघाताने कोसळला. उपचारासाठी जवळच्या सरकारी […]

1 7 8 9 10 11 33
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..