नवीन लेखन...

घरगुती लेप

चण्याचे पीठ/ मसुरच्या डाळीचे पीठ/ मक्याचे पीठ/ मेथीचे पीठ किंवा ओटचे पीठ यामध्ये लिंबाचा रस साध्या पाण्यात मिसळून लेप लावावा. संत्री, मोसंबी, लिंबे यांच्या सालींच्या आतल्या भागातले पांढरे धागे काढून टाकून साली वाळवाव्यात. त्यांची बारीक भुकटी करावी व कुठल्याही फेसपॅकमध्ये अर्धा ते एक चमचा घातली तर चेहऱ्याला ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात मिळते. ‘पपई’ या फळात ‘पेपेन’ […]

शांत झोपेसाठी…

– जायफळ तुपात उगाळून तयार केलेला थोडासा लेप निजण्यापूर्वी हळूहळू कपाळावर चोळल्यास गाढ झोप येण्यास मदत मिळते. – पाव चमचा जटामांसी आणि पाव चमचा धमासा चार-पाच तासांसाठी पाण्यात भिजत घालून ठेवून झोपण्यापूर्वी गाळून घेतलेले पाणी प्यायले तर डोके शांत होऊन झोप लागणे सोपे होते. – ज्यांच्या प्रकृतीला वांगे चालत असेल त्यांनी वांगे भाजून घ्यावे, ते थंड […]

वात दोषाचे पथ्यापथ्य

असं म्हणतात,  वाताला मित्राप्रमाणे जिंकावे, पित्ताला जावयाप्रमाणे सांभाळावे आणि कफाला शत्रूप्रमाणे वागवावे. वाताच्या पथ्यामधे सर्वात महत्वाचा आहारीय पदार्थ म्हणजे तेल. आपण ज्या प्रदेशात रहातो, त्या प्रदेशातील तेलबियांपासून घाण्यावर काढलेले तेल, अनरिफाईंड तेल कच्च्या स्वरूपात जेवणात घेणे म्हणजे वाताची अर्धी चिकित्सा आहे. हे तेल प्रदेशानुसार ठरवावे. जसे कोकणात खोबरेल तेल, घाटावर शेंगतेल, युपी मधे सरसोंका तेल, पण […]

शाळा, शिक्षक, मुलं आणि सकाळ…

पहाट होते.जाग येते.सूर्य उगवतो . तसा वेध लागतो.उरक वाढतो. आंघोळ होते . सकाळचा चहा होतो. आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम सुरू असतात. नियमितपणे. बातम्या , भक्तीसंगीत, आरोग्याचे कार्यक्रम वगैरे. जेवणाचा डबा तयार होतो. तोपर्यंत असते दारात हजर वर्तमानपत्र . ठळक बातम्या आणि संपादकीय पानावर लेख वाचण्याची मजा काही औरच. पक्षांचा किलबिलाट.. मंदिरातील घंटा घण्- घण वाजते. सूर्य किरणं […]

आयुमित्र – डायबेटीस आणि आयुर्वेद

आंतरराष्ट्रीय डायबेटीज फौंडेशनच्या आकडेवारीनुसार सध्या भारतात ६२ दशलक्ष डायबेटीसचे रुग्ण आहेत. सध्या भारतात डायबेटीस रुग्णांची संख्या हि इतर देशांच्या तुलानेत सगळ्यात जास्त आहे. इंडिअन हार्ट असो. नुसार २०३५ मध्ये भारतात १०९ दशलक्ष रुग्ण डायबेटीसचे असतील. हि आपल्या चिंतेची बाब आहे. डायबेटीसने होणाऱ्या मृत्यूंची संख्या सुद्धा वाढेल असे आकडे वारीहून दिसून येते. ह्याचे कारण काय? 1) हाय […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग सदतीस

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक नऊ कामासाठी दिवस, विश्रांतीसाठी रात्र-भाग दोन ज्यांना रात्रीचं काम करण्याची मजबुरी असेल त्यांनी काय करावं ? रात्रीच्या जागरणाच्या निम्मे वेऴ जेवणापूर्वी दिवसा झोपावे. आपलं जेवढं काम असतं, जसं काम असतं, त्यामानाने पुरेशी झोप घेतलीच पाहिजे. शांत झोपेमधे शरीरातील सर्व अवयवांना विश्रांती मिळत असते. अधिक जोमाने काम करण्यासाठी ही विश्रांती उपयोगी होते. दिवसभर काम […]

खर प्रेम काय असत?????

एक धनगर मेढया चरायला सोडुन ढोल वाजवत बसला होता. त्याने पाहीलं की ढोलच्या आवाजाने एक हरीणी त्याच्या शेजारी येऊन बसली. जसजशी त्या ढोलवर धनगराची थाप पडायची तसतसं त्या हरीणीच्या डोळ्यांतुन अश्रु यायचे. एक दिवस गेला. दोन दिवस गेले, तीन, चार, पाच दिवसांमागुन दिवस गेले. पण परिस्थिती काही बदलत नव्हती. धनगर जसजसं ढोल वाजवायचा ती हरीणी तिथे […]

रॅन्समवेअर व्हायरस

‘रॅन्समवेअर व्हायरस’ म्हणून ओळखला गेलेला आत्तापर्यंतचा सर्वात मोठा सायबर हल्ला झाल्यान शुक्रवारचा दिवस हा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी काळा दिवस ठरला. ‘वन्नाक्राय’ या रॅन्समवेअर व्हायरसने अक्षरश: धुमाकूळ घातला. सायबर सिक्युरिटी फर्म ‘अव्हास्ट’ने सांगितले की, भारतासहशंभराहून अधिक देश या हल्ल्याचे शिकार झाले. या हल्ल्याचा सर्वात जास्त फटका इंग्लडला बसला. इंग्लडमधील हॉस्पिटल्स आणि टेलिफोन यंत्रणा यामुळे खिळखिळी झाली. अनेक […]

मुक्ता बर्वे

मुक्ता बर्वेचे वडील श्री वसंत बर्वे टेल्को कंपनीत नोकरी करत होते, तसेच आई विजया बर्वे या शिक्षिका तसेच नाट्यलेखिका होत्या. मोठा भाऊ देबू बर्वे कमर्शियल आर्टिस्ट आहे तसेच त्याने लहानपणी काही चित्रपटातून भूमिका केल्या आहेत. तिचा जन्म १७ मे १९८१ रोजी पिंपरी चिंचवड पुणे येथे झाला. रंगभूमीवरील मुक्ताची सुरुवात बालपणापासून झाली. मुक्तावर कलेचे संस्कार लहानपणापासून घरातूनच होत होते. मूळचा […]

लोकप्रिय गझल गायक पंकज उदास

१९८६ साली ‘नाम’ या चित्रपटातील ‘चिठ्ठी आयी है..’ या गाण्याच्या माध्यमातून पंकज उधास नावारूपाला आले. त्यांचा जन्म १७ मे १९५१ रोजी झाला. आज देशातील गझल गायनातील ते एक प्रमुख गायक मानले जातात. त्यांनी गझल गायनाला एक वेगळी शैली आणि आयाम प्राप्त करून दिले आहे. पंकज उदास यांनी एक से बढकर एक गझल देत रसिकांना त्यांच्या दुनियेत मश्गुल केले. सारं […]

1 12 13 14 15 16 33
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..