नवीन लेखन...

पटसंख्येवरील मुले शाळेत कधी दिसणार ?

आयएसओ , प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, शाळा सिध्दी, उपक्रमशील शाळा असे नविनच उच्चारण हल्लीच्या शिक्षण प्रक्रियेत ऐकायला मिळत आहेत. तसेच शाळा एक मंदीर आहे. शिक्षक हे पुजारी आहेत . विद्यार्थी हे दैवत आहे . असे काही सुविचार ऐकायला , पहायला मिळतात. एकंदरीत  आजच्या शिक्षणप्रणालीचा विचार केल्यास ती विद्यार्थीकेंद्रित आणि कृतीयुक्त बनलेली आहे. तुला मोठा झाल्यावर काय व्हायचे […]

माहेर कविता

नदीचा उगम पर्वत/ डोंगरातून होतो त्यामुळेच नदीला गिरीजा, शैलजा अशी नावे आहेत. समुद्र हा नदीचा नवरा मानला जातो. एकदा समुद्राला मिळाल्यावर नदी परत पर्वताकडे जात नाही म्हणून नदीला माहेर नाही असे म्हणतात. गदिमांनी ह्या कवितेत हा समज खोडून काढत जलचक्र किती सुंदर शब्दात सांगितलं आहे.. नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर, अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला […]

दगड

दगड फुटतो, शिल्प बनतो दगड रंगतो, रस्ता सांगतो दगड घडतो, घर बांधतो दगड जमतो, डोंगर बनतो दगड बनतो, चंद्रावर जातो दगड पळतो, चिंचा पाडतो दगड जोडतो , पूल बनतो दगड सोसतो, साज सजतो दगड बोलतो, नावं सांगतो दगड खुलतो , अंक मोजतो दगड पळतो, खेळ खेळतो दगड कोरतो , गुहा बनतो दगड रूळतो, जातं पळवितो दगड […]

वाया जाणारे अन्न वाचवता येईल

लग्नसराई सुरू असते. प्रत्येक जण लग्नाच्या गरबडीत असतो.घरामध्ये उत्साह असतो.याच उत्साही वातावरणात आपण काय करतो.याचे भान नसते. लग्नकार्यात अनेक बाबी हितकारक घडतातच असे नाही. काही परंपरा जपल्या जातात. वधुवरांची मिरवणूक असते. वर्‍हाडींचा थाटमाट असतो. पै पाहुण्यांचे आदरातिथ्य असते. भोजनावळी उठतात.हे प्रत्येक धर्मामध्ये कमीअधिक प्रमाणात घडत असते. त्यामुळे मानवी जीवनात आनंद घेणो हा एक हेतू यामागे असतो. […]

महाराष्ट्र राज्याचा संक्षिप्त आढावा

राज्यात उष्ण कटिबंधीय मोसमी हवामान आहे. मार्चपासून सुरु होणारा, अंगाची लाहीलाही करणारा उन्हाळा जूनच्या सुरुवातीला पाऊस घेऊन येतो. पावसाळ्यातील हिरवळीत लपेटलेले आल्हाददायी वातावरण, ऑक्टोबरच्या त्रासदायक वातावरणानंतर येणार्‍या हिवाळ्यात टिकून राहते. […]

तेल तुपाचे भूत

अमेरिकेतील आहारतज्ज्ञांनी काही दिवसांपूर्वी शारीरिक स्वास्थ्यासाठी आवश्यक कोलेस्टरॉलची मर्यादा पुन्हा नव्यानं ठरवण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. वॉशिंग्टन पोस्टसह अन्य नामांकित वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार अमेरिकन आहारतज्ज्ञांनी ४० वर्षांपूर्वी कोलेस्टरॉलच्या चांगल्या-वाईट व्याख्या ज्या ठरवल्या होत्या त्याचाही पुनर्विचार केला जाणार आहे. पाच वर्षांपूर्वी पोषक आहारतज्ज्ञांच्या एका समितीने ‘न्यूट्रिशन आॅफ कर्न्सन’ अर्थात काळजीयुक्त पोषणाची चर्चा गुड आणि बॅड कोलेस्टरॉलच्या […]

जगप्रसिद्ध परिचारिका फ्लोरेन्स नाईटिंगेल

फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचा जन्म १२ मे १८२० रोजी इटली येथे झाला. त्यांनी केलेल्या कार्याच्या स्मृती सदैव तेवत राहाव्या म्हणून त्यांचा जन्मदिवस ‘जागतिक परिचारिका दिन’ म्हणून संपूर्ण जगभर साजरा करण्यात येतो. फ्लोरेन्स नाईटिंगेल यांनी सेवाभाव, समर्पण आणि प्रेम यांचे प्रतीक असलेल्या आणि आरोग्य सेवा क्षेत्रात कर्तृत्वाचा अमीट ठसा उमटवला होता. हा दिवस जगभर जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. परिचारिका […]

जागतिक कुटुंब दिन

१५ मे १९९४ रोजी युनायटेड नेशन्समध्ये सर्वप्रथम जागतिक कुटुंब दिन साजरा करण्यात आला होता. आजच्या व्हॉट्सअप, फेसबुकच्या जमान्यात विभक्त कुटुंब पद्धतीचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे अनेकदा मुलांची त्यातून फरफट होते. मुळातच पाळणा घरापासून आयुष्याची सुरुवात करणाऱया मुलांना घरच्या संस्काराची उणीव भासतेच. ‘छोटे कुटुंब, सुखी कुटुंब’ या संकल्पनेचे अनुकरण केल्याने नवीन पिढीला कौटुंबिक स्वास्थ्य मिळणे अवघड झाले […]

बंगाली गायक सुबीर सेन

हेमंतकुमारसारखा आवाज असलेल्या सुबीर सेन यांना हिंदी चित्रपटांमध्ये फार थोडी गाणी मिळाली आणि तीही शंकर जयकिशन यांच्या मुळे. १९५०च्या काळात हेमंतकुमार फार लोकप्रिय होते. त्यांचा जन्म १५ मे १९३२ रोजी झाला. त्यामुळे तशाच आवाजाच्या सुबीर सेन यांना शंकर जयकिशन यांनी ‘आस का पंछी’ चित्रपटात संधी दिली. नायक राजेंद्रकुमार व एनसीसी कॅडेटनी सायकलवरून म्हटलेले सुबीर सेन यांचे गाणे ‘दिल मेरा […]

धक धक गर्ल माधुरी दीक्षित

‘सुंदरता’, ‘नृत्य’ आणि ‘अभिनय’ यांचा सुरेख त्रिवेणी मिलाफ म्हणजे माधुरी दीक्षित. तिचा जन्म १५ मे १९६७ रोजी झाला. पूर्वाश्रमीची माधुरी शंकर दीक्षित आणि आजच्या माधुरी श्रीराम नेने. माधुरी ही ख-या अर्थाने सौंदर्य, अभिनय आणि नृत्य यांचा अभूतपूर्व एकत्रित संगम आहे. तिच्या आधीच्या सर्व सुपरस्टार या कुठे ना कुठे कमी होत्या. अपवाद फक्त रेखाचा. मधुबालाला नृत्यात मास्टरी नव्हती तर हेमा […]

1 17 18 19 20 21 33
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..