नशीब
का असा धांवतोस तूं , नशिबाच्या मागें मागें, यत्न होता भगिरथी, नशीब येईल संगे ।।१।। प्रयत्न होतां जोमाने, दिशा दिसताती तेथें, यशाचे ध्येय सदैव, योग्य मार्गानें मिळते ।।२।। प्रयत्न करूनी बघा, ईश्वर देखील मिळेल, इच्छा शक्ती प्रभावानें, नशीबही बदलेल ।।३।। डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com