विशाळगड ते लांजा व्हाया ‘माचाळ’
घोल ते रायगड असे आम्ही चालत गेलेलो एकदा. तेव्हाचं सगळं सांगून झालाय. पानशेतच्या पुढे पानशेतचा जलाशय शेजारी ठेवून २८ किमी वर ते घोल नावाचं गाव आहे. तिथून पुढे सह्याद्री उतरत जायचं आणि मग पायथ्याला गेलो कि तिथून दहा-बारा किलोमीटर वर रायगड आहे. असा एकूण वीस-पंचवीस किमीचा रस्ता असेल. पुण्यातून जाणारी एसटी घोलमध्ये संध्याकाळी साडेसात नंतर पोहोचते. […]