नवीन लेखन...

निसर्गावर अवलंबून

कितीही सारी धडपड करशी लाचार ठरतो अखेरी जाण माणसा मर्यादा तव आपल्या जीवनी परी … ।। क्षणाक्षणाला अवलंबूनी जीवन असे तुझे सारे पतंगा परि उडत राहते जसे सुटत असे वारे… ।। निसर्गाच्याच दये वरती जागत राहतो सदैव कृतघ्न असूनी मनाचा तूं विसरून जातो ती ठेव… ।। निसर्गाच्या मदती वाचूनी जगणे शक्य नसे तुजला जीवन कर्में करीत […]

गूढ रम्य, निसर्गरम्य — मालवणजवळचा धामापूर तलाव !

या तलावाच्या परिसरात विलक्षण शांत निसर्ग पसरलेला आहे. तेथे या तलावाबाबत काही गूढ आख्यायिका आहेत. पूर्वी येथील देवीला प्रार्थना केली की एखाद्या गरीब मुलीच्या विवाहासाठी, तलावातून दागिन्यांची परडी वर येत असे. लग्न झाले की हे दागिने परडीत भरून पुन्हा तळ्यात सोडून दिले जात. पण कुणालातरी दागिने परत न करण्याचा मोह झाला आणि नंतर हे दागिने येणे […]

प्रेम

प्रेम कसं ! हळुवार यायला हवं तुमच्या आयुष्यात जशी कडक उन्हात तुमच्या अंगाची लाही लाही होत असताना एखादी वाऱ्याची हलकीशी झुळूक येते तशी… प्रेम कस ! आनंदात ,बागडत आणि उडत यायला हवं तुमच्या आयुष्यात तुम्हाला एक नाजूक , सुंदर आणि आकर्षक फुल समजून एखाद्या रंगीबेरंगी फुलपाखरासारखं… प्रेम कसं ! स्वप्नात नसतानाही व्हावं त्यात गुंतून पडावं पण […]

जाणीव

माझ्या कविता,माझ्या कथा माझ्या नसतात,त्या तिच्या असतात त्या जगाला,तिच्या असण्याची माझ्या आजूबाजूला, आणि माझ्या अस्तित्वातील जगण्यात तिच्या भूमिकेची जाणीव करून देत असतात… ©कवी – निलेश बामणे

तुझ्यासाठी काही ही

तुझ्यासाठी काही ही करणार नाही मी माझ्या विचारांशी तडजोड तुझ्यासाठी करणार नाही मी तुझ्यासाठी काही ही करणार नाही मी तुझ्यासाठी माझा जीव कधीच देणार नाही मी तुझ्यासाठी काही ही करणार नाही मी तुझ्यासाठी माझ्या नात्यांचा बळी देणार नाही मी तुझ्यासाठी काही ही करणार नाही मी पण तुझ्या प्रेमाला कधीच नकार देणार नाही मी तुझ्यासाठी काही ही […]

पानशेत ते रायगड (चालत)

भव्य हिमालय तुमचा, आमचा केवळ सह्यकडा, गौरी शंकर उभ्या जगाचा मनात पूजीन रायगडा!! ही कविता बहुतेक वसंत बापटांची आहे. आणि वैयक्तिक मला हिमालयाचं आकर्षण मुळीच नाही. अनेक ट्रेकर्स ‘एव्हरेस्ट’ सर करणं हे आपलं स्वप्न मानतात, माझी मात्र उडी सह्याद्रीच्या पुढे पडणार नाही. ‘ट्रेकिंग’चे सर्वच अनुभव खूप समृद्ध करणारे असतात. असच दोन एप्रिल महिन्यातच आम्ही ४-५ जणं […]

मराठी लेखक, कोशकार लक्ष्मण शास्त्री जोशी

लक्ष्मण शास्त्री जोशी यांचे संस्कृत भाषेवर प्रभुत्व होते, हिंदू धर्माचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. त्यांचा जन्म २७ जानेवारी १९०१ रोजी धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे झाला. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत इत्यादी शास्त्रांवर ते अधिकारवाणीने बोलू शकत. हिंदू तत्त्वज्ञान त्यांनी चांगल्या प्रकारे अवगत केले होते. लक्ष्मण शास्त्री जोशी यांची ओळख मुख्यत: `मराठी विश्वकोषाचे शिल्पकार’ अशी असली, तरी ती ओळख अपुरी […]

प्रसिद्ध मराठी लेखक व टीकाकार भालचंद्र नेमाडे

भालचंद्र नेमाडे यांचे उच्च शिक्षण, पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजातून, व डेक्कन कॉलेजातून झाले. नंतर त्यांनी इंग्रजी साहित्यात मुंबई विद्यापीठातून एम.ए. केले. नेमाडे यांना जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून डी.लिट. ही सन्माननीय पदवी मिळाली आहे. त्यांचा जन्म २७ मे १९३८ रोजी सांगवी, खानदेश येथे झाला. १९७४ पासून औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठात व शेवटी ते मुबई विद्यापीठात तुलनात्मक साहित्याच्या अभ्यासाठी स्थापन झालेल्या गुरुदेव टागोर […]

महाराष्ट्र साहित्य परिषदेचा १११ वा वर्धापन दिन

मराठी भाषा आणि साहित्य यांची जपणूक, विकास व प्रसारासाठी ज्या संस्था सातत्याने कार्यरत आहेत, त्यापैकी सर्वात आद्य संस्था म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषद. मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि समीक्षा यांचे जतन आणि संवर्धन करण्याचे काम ही संस्था गेली अनेक वर्षे करते आहे. पुणे, नगर, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग सत्तेचाळीस

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 2 जसे आचमनातून आपल्याला कळले की अनावश्यक पाणी फक्त पळीभरच म्हणजे चमचाभरच प्यायचे असते. अन्यथा नाही. आयुर्वेदात हेच सांगितले आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, नित्य म्हणजे नियमाने करायच्या कर्मांमधे देवपूजा सांगितलेली आहे. यात ठराविक वेळ पाळणे अत्यंत आवश्यक आहे. ‘मला सवड झाली की देवपूजा’ असं करू […]

1 3 4 5 6 7 33
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..