जेष्ठ मराठी गायिका ललिता देऊळगावकर फडके
ललिता फडके या पूर्वाश्रमीच्या त्या ललिता देऊळगावकर. ललितापंचमीच्या दिवशीचा त्यांचा जन्म. वडील कापडाचे व्यापारी. त्यांचे दोन काका उत्तम गाणारे होते आणि आजीचाही आवाज गोड, त्यामुळे त्यांच्याच प्रेरणेने ललिता गाणं शिकल्या. पण गाणं हे घरापुरतं ठेवायचं, हा त्या काळातल्या सर्वसाधारण मंडळींचा दृष्टिकोन. त्यामुळेच शेजारच्या बंगाली कुटुंबाकडे आलेले कवी आणि अभिनेते हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांनी या मुलीचा आवाज ऐकला […]