गंगाई..
हरीद्वारला आमचा मुक्काम विष्णू घाटावरील एका लहानश्या आणि बऱ्याश्याही हाॅटेलात आहे. हाॅटेलातील रुमच्या खिडकीतून समोर अव्याहत वाहणाऱ्या गंगेचं सततच दर्शन होतं असतं. वेगानं वाहणारी गंगा, तिचा वाहताना होणारा आवाज, दिवसाच्या वेळी जाणवत नसला तरी, रात्री दहानंतरच्या निरव शांततेत हा आवाज मंत्रजागरासारखा जाणवतो. किंचित हिरवट झांक असणारं ते पाणी गेली कित्येक शतकं तसंच वाहतं आहे आणि पुढेही […]