चहास्तोत्र
शीणसुस्ती महानिद्रा क्षणात पळवी चहा, प्रभाते तोंडधुवोनी, घेता वाटे प्रसन्नता !!१!! अर्धांगीनीहस्ते घेता, निद्रा तात्काळ विरघळे, पुन्हा स्नानांतरे घेता अंगी चैतन्य सळसळे !!२!! लिंबुयुक्ता विना दुग्धा अरूची पित्त घालवी, शर्करेविना घेता, मधुमेह न गांजवी !!३!! शितज्वर शिर:शुळा , खोकला नाक फुरफुरा, गवतीपत्र अद्रकायुक्ता, प्राशिता जाई सत्वरा !!४!! भोजनपुर्व प्राशिता, मंदाग्नी पित्तकारका, घोटता घोटता वाढे, टँनीन जहरकारका […]