किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक श्रीकांत देशपांडे
श्रीकांत देशपांडे हे रामभाऊ कुंदगोळकर ऊर्फ सवाई गंधर्व यांचे नातू होत. त्यांचा जन्म १२ जून १९४८ रोजी झाला. त्यांचे वडील डॉ. वसंतराव तथा नानासाहेब देशपांडे यांचा सवाई गंधर्व संगीत महोत्सवाच्या आरंभापासून महत्त्वाचा वाटा होता. श्रीकांत देशपांडे यांनी संगीताचे प्राथमिक शिक्षण सरस्वतीबाई राणे यांच्याकडून घेतले. त्यानंतर पं. भीमसेन जोशी यांच्याकडेही त्यांनी किराणा घराण्याची तालीम घेतली. त्यानंतर किराणा घराण्यातील ज्येष्ठ गायक […]